शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात आरोग्य पथकाला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी सुरू केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी सुरू केली आहे़ सोमवारी या भागातील अब्दुल हमीद चौक, टेकभिलाटी व कुरेशी नगर या भागात वैद्यकीय पथक गेले असता तेथील नागरिकांनी मोठ्या संख्येने पथकाच्या अंगावर धावून येत पथकाला वैद्यकीय तपासणीसाठी विरोध केला.या वेळी मोठा जमाव जमला होता. विशेष म्हणजे पोलिसांसमोर ही घटना घडल्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तपासणी न करता माघारी फिरणे पसंत केले. तपासणी करणाºया वैद्यकीय पथकाला विशेष संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. २४ व २५ एप्रिलला प्रभाग क्रमांक चारमध्ये दोन कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी या भागातील कंटेन्मेंट व बफरझोन जाहीर केले आहेत. ३० वैद्यकीय पथकामार्फत सुमारे १७ हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी सलग १४ दिवस करण्यात येणार आहे. सोमवारी या कंटेन्मेंट झोनमधील अब्दुल हमीद चौक, कुरेशी नगर व टेकभिलाटी या भागात वैद्यकीय पथक नागरिकांच्या तपासणीसाठी गेले असता सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या संख्येने जमाव जमला. हा जमाव वैद्यकीय पथकाच्या अंगावर धावून गेला़ यावेळी त्यांच्याकडून तपासणीसाठी मनाई केली. जमाव अंगावर थेट चालून आल्याने पथकातील आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक व कर्मचारी हे प्रचंड घाबरले होते़ काहींनी तेथून माघार घेतली तर बाकीच्यांनी पोलीसांच्या वाहनात आसरा घेतला़प्रभाग चार मुस्लिम व आदिवासीबहुल दाट वस्तीचा हा भाग आहे. हा सर्व परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये मोडतो. रविवारी रात्री असाच प्रकार गरीब-नवाज कॉलनीमध्ये घडला होता. तेथेही जमावाने आरोग्य पथकाला तपासणी करण्यापासून मज्जाव करत विरोध केला होता़ सोमवारी सलग दुसºया दिवशी वैद्यकीय पथकासोबत असा प्रकार घडल्याने पथकातील कर्मचारी भयभीत झाले असून पुरेशी सुरक्षा व पोलीस संरक्षण मिळाले तरच प्रभाग चारमध्ये तपासणी करु अन्यथा, रुग्णालयातच थांबू असा पवित्रा पथकाने घेतला आहे़घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र पेंढारकर यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांशी संवाद साधला. परिसरातील नगरसेवक, मशिदीतील मौलाना व सुज्ञ नागरिकांना बोलावून त्यांची तातडीची बैठक घेत कंटेनमेंट झोनमधील नागरिकांची नियमित वैद्यकीय तपासणी आवश्यक असल्याने सर्वांनी सहकार्य करावे. लोकप्रतिनिधींनी वैद्यकीय पथकातील कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी, अशा सूचना देण्यात आल्या.शहादा येथे सलग दुसºया दिवशी वैद्यकीय पथकासोबत अशोभनीय घटना घडल्याने याचा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहे. नागरिकांमध्ये वैद्यकीय पथकाबाबत गैरसमज, अफवा पसरविणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.प्रभाग क्रमांक चारमध्ये जीवाला धोका असून केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच बचावलो आहोत. वैद्यकीय कर्मचारी कुटुंब घरदार सोडून नागरिकांची वैद्यकीय तपासणी करत आहेत़ कोणत्याही नागरिकाला कोरोना विषाणूचे संक्रमण होणार नाही याची खबरदारी आरोग्य पथक घेत आहे़ यामुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करणे अपेक्षित आहे़ परंतू याउलट प्रभाग चारमध्ये जमाव जमतो, अरेरावीची भाषा केली जाते, आम्हाला आमच्या कर्तव्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही अशी अगतिकता एका आरोग्य कर्मचाºयाने ‘लोकमत’ जवळ बोलून दाखवली़