३० गावांचा संपर्क असलेल्या प्रकाशा गावात केवळ शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 01:05 PM2020-03-27T13:05:38+5:302020-03-27T13:05:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा ...

Only silence in Prakash village with 2 villages in contact | ३० गावांचा संपर्क असलेल्या प्रकाशा गावात केवळ शांतता

३० गावांचा संपर्क असलेल्या प्रकाशा गावात केवळ शांतता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : दक्षिण काशी म्हणून संपूर्ण देशात लौकिक असलेल्या प्रकाशा ता़ शहादा येथे लॉकडाऊनमुळे जनजीवनावर मोठा परिणाम जाणवत आहे़ परंतू आरोग्य अबाधित ठेवून कोरोना हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थ घरात राहणे पसंत करत आहेत़ यामुळे गावात केवळ शांतता असून ३० गावांचा संपर्क असलेली बाजारपेठ बंद असल्याने आर्थिक घडीही विस्कटली आहे़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या जनता कर्फ्यूत येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता़ त्यानंतर सोमवारी सर्व काही सुरळीत होण्याची अपेक्षा असताना राज्यसरकारने लॉकडाऊनची घोषणा केली होती़ ग्रामीण भागासाठी हे बंधनकारक नसले तरीही त्यात नागरिकांनी सहभाग घेतला़ पंतप्रधान मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून मात्र गावात पूर्णपणे शुकशुकाट आहे़ प्रकाशा पोलीस दूरक्षेत्र आणि ग्रामपंचायत पदाधिकारी व सफाई कामगार यांच्यासह केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचा येथे दैनंदिन वावर आहे़ बºहाणपूर-अंकलेश्वर आणि सेंधवा-विसरवाडी या दोन महामार्गांवरचे प्रमुख गाव असल्याने गावातील तसेच चौफुलीवरचे सर्व हॉटेल्स गेल्या चार दिवसांपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत़ यामुळे बसस्थानक, गावातील गांधी चौक, गढी परिसर यासह केदारेश्वर मंदिर परिसरातही लॉकडाऊन आहे़ मंदिराच्या परिसरात राहणारे किरकोळ व्यावसायिकांची दुकानेही गेल्या चार दिवसात उघडलेली नाहीत़ मंदिरे बंद असल्याने भाविकच येत नसल्याने येथे वास्तव्य करणाºया व्यावसायिकांनीही दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ गावातील विविध भागात दररोज सायंकाळी बसणारे नागरिकही दिसून येत नसल्याने जागोजागी ठेवण्यात आलेले बाकही रिकामे आहेत़ ग्रामपंचायतीकडून गावात दोन वेळेस औषध फवारणी आणि स्वच्छता करण्यात येत आहेग़ावातील ९० टक्के नागरिक हे घरीच राहणे पसंत करत असून १० टक्के नागरिकच केवळ गरजेच्या वस्तू घेण्यासाठी बाहेर पडत आहे़ महामार्गाच्या दुसºया बाजूला वैजाली रोड परिसरातील रहिवासी वसाहतीतही शुकशुकाट आहे़

प्रकाशा येथील आठवडे बाजाराला १०० वर्षांपेक्षा अधिकची परंपरा आहे़ दर बुधवारी भरणारा हा आठवडे बाजार प्रथमच बंद पडला आहे़ येत्या बुधवारीही हा बाजार भरणार नसल्याने तळोदा आणि शहादा तालुक्यातील ३० गावांच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे़
४गावात सध्या केवळ दूध, मेडीकल दुकाने, भाजीपाला, बँक, ग्रामपंचायत आणि महसूल विभागाचे कर्मचारी दिसून येत आहेत़
शेतशिवारात जाण्यास मजूरही धजावत नसल्याने शेतकऱ्यांची कामे पूर्णपणे ठप्प पडली आहेत़ बहुतांश शेतकºयांनी स्वेच्छेने शेतीकामांना थांबा दिला आहे़ विशेष म्हणजे काही शेतकºयांनी मजूरांची आबाळ होवू नये म्हणून त्यांना आगाऊ रोजगार देत त्यांची सोय करुन दिली आहे़

दरम्यान प्रकाशा येथील ग्रामपंचायतीने कोरोनापासून नागरिकांचा बचाव व्हावा यासाठी ग्रामस्थांना मास्क वाटप केले. किराणा दुकानावर गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांमध्ये तीन फुटाचे अंतर त्यांनी ठरवून दिले आहे. गावांमध्ये रिक्षा फिरवून जनजागृती करण्यात आली होती. ग्रामपंचायतीने दीड हजार मास्क ग्रामस्थांना वाटप केले. कोरोना सरपंच सुदाम ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, गटविकास अधिकारी सी़टीग़ोसावी, ग्रामसेवक बी.जी. पाटील, ग्रामपंचायत सदस्य अरुण भिल, रफिक खाटीक, विस्तार अधिकारी भरत निकुंभे उपस्थित होते़
प्रकाशा गावातील सर्वाधिक प्रसिद्ध असा मासळी बाजार आणि बॅरेजमधील मासेमारी बंद असल्याने मच्छीमारही घरीच बसून आहेत़

Web Title: Only silence in Prakash village with 2 villages in contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.