तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:14 PM2019-05-21T12:14:45+5:302019-05-21T12:15:05+5:30

जिल्ह्याची स्थिती : पाच वर्षात गमावले ९०१ जणांनी प्राण, ७७४ प्राणांकित अपघात

One patient accident behind three patients | तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघाताचा

Next

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात सन २०१४ ते एप्रिल २०१९ पर्यंतच्या साधारणत: पाच वर्षांच्या कालावाधीत एकूण झालेल्या ७७४ प्राणांकीत (फेटल) अपघातात एकूण ९०१ जणांचा बळी गेला आहे़ तर जिल्ह्यातील एकूण अपघातांची संख्या पाच वर्षात २ हजार ८०३ वर जाऊन पोहचली आहे़ दर तीन रुग्णांमागे एक रुग्ण अपघातातील जखमी असल्याची माहिती आहे़
गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे़ यात, किरकोळ अपघातांसह प्राणांकीत अपघातांचाही मोेठ्या प्रमाणात समावेश आहे़ वारंवार अपघात होत असल्याने याबाबत प्रशासनाकडून तत्काळ उपाय योजना करणे आवश्यक ठरणार आहे़ वाढते अपघात आटोक्यात आणण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे़
२०१४ साली जिल्ह्यात एकूण ६०५ अपघातांची नोंद करण्यात आली़ यात १२८ प्राणांकित अपघतांचा समावेश असून यात एकूण १५२ जणांना मृत्यू झाला़ २०१५ साली ५८७ अपघात झालेत़ यात १४३ प्राणांकित अपघातात १७५ जणांना मृत्यू झाला़ २०१६ या वर्षी ६२३ अपघात झालेत़ यात एकूण १५४ प्राणांकित अपघाताचा समावेश असून यात, १७९ जणांचा बळी गेला़
२०१७ साली ५२७ अपघातांची नोंद करण्यात आली असून यात १२८ प्राणांकित अपघात आहेत़ त्यात, १४६ जणांना आपला प्राण गमवावा लागला़ २०१८ या वर्षी एकूण ३३७ अपघातात सर्वाधिक म्हणजे १६२ प्राणांकित अपघात झाले़ यात १७७ जणांना मृत्यू झाला़ तर एप्रिल २०१९ पर्यंत जिल्ह्यात एकूण १२४ अपघात झाले असून यात ५९ प्राणांकित अपघतांचा समावेश आहे़ तर ७२ जणांना यात बळी गेला आहे़ रस्त्यांची दैनिय स्थिती, वाहनांचा वाढता बेशिस्त वापर, अवजड वाहनांची समस्या तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे वाहतुकीच्या नियमांचे झालेले तिनतेरा यामुळे गेल्या पाच वर्षात अपघातांचा आलेख पाहिला असता यात वाढ झालेली दिसून येत आहे़ शेकडो जण जखमीही झालेत आहेत़ गेल्या काही वर्षांमध्ये जिल्ह्यात कमालीची बेशिस्त वाहतूक वाढली आहे़ याचा परिणाम म्हणून अपघातांच्या संख्येतही घसघशीत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे़ शहरी भागासह ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांवर खड्डे तसेच साईडपट्टयांची समस्या जाणवत आहे़
त्यामुळे सध्याची रस्त्यांची स्थितीही या अपघातास कारण की.. अशीच दिसून येत आहे़ दरम्यान, अनेक ठिकाणचे निमुळते रस्ते, धाकेदायक वळणे आदी ठिकाणी अपघातांच्या संख्येत अधिक वाढ होत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून येत आहे़ जिल्ह्यातील पुलांची स्थितीदेखील अत्यंत दैनिय झाली आहे़ त्यामुळे अशा पुलांचे सर्वेक्षण करुन प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे़ याबाबत आॅडीट होणे अपेक्षीत आहे़

Web Title: One patient accident behind three patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.