शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

४८ गावे ११ पाड्यांमधील एक लाख ग्रामस्थ तहाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:35 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रशासनाची धावपळ, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर मर्यादा यामुळे पाणी टंचाईने होरपळणाºया गावांना कुणीही वाली नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १ लाख दोन हजार ९१२ लोकसंख्येच्या ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पर्यायी उपाययोजना नसल्याने पाणी टंचाईने होरपळणाºया नागरिकांना जंगलात, दºयाखोºयात पायपीट करावी लागत आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीचा १४२ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यातील पावसाने सरासरी ओलांडली होती. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ९५ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता राहणार नाही असे वाटत असतांना ४८ गावे व ११ पाड्यांमध्ये सर्व्हेक्षणाअंती टंचाईच्या झळा बसण्याचे स्पष्ट झाले. आता मे महिना सुरू झाला तरी या गावांना टंचाईच्या उपाययोजना केल्या गेल्या नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.शेवटचा टप्पा खडतरफेब्रुवारीपर्यंत टंचाईग्रस्त गावांना पाण्याची फारशी समस्या भेडसावली नाही. शेवटचा टप्पा अर्थात मार्च ते मे दरम्यान तीव्र टंचाईची शक्यता गृहीत धरून मार्च महिन्यात उपाययोजनांना गती देण्यात येणार होती. परंतु मार्चच्या दुसºया आठवड्यापासून कोरोनाची तीव्रता वाढली. तिसºया आठवड्यात अर्थात २३ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी या गावांना पर्यायी उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमरता, कामासाठी मजुरांची टंचाई, वाहने न मिळणे यासह इतर समस्यांमुळे उपाययोजना होऊच शकल्या नाहीत. परिणामी या गावांना आता भर उन्हाळ्यात तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाटंचाईच्या झळा असलेल्या सर्वाधिक २४ गावे ही नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल १२ गावे शहादा तालुक्यातील असून नवापुर तालुक्यात सहा गावे व नऊ पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ४ गावे तर धडगाव तालुक्यात दोन गावे व दोन पाड्यांचा समावेश आहे. भूजल विभागाच्या सर्व्हेनुसार ही गावे असले तरी सद्य स्थितीत यापेक्षा दुप्पट गावे व पाड्यांवर टंचाईचा सामना करावा लागत आहे.कुपनलिकांवर हातपंपच नाहीतगेल्या वर्षी टंचाईच्या काळात सातपुड्यातील धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील अनेक गाव, पाडयांमध्ये कुपनलिका करण्यात आल्या. त्यांना पाणीही बºयापैकी लागले, परंतु अशा ठिकाणी हातपंपच बसविण्यात आले नसल्याने त्या कुपनलिका नुसत्याच शोभेच्या वस्तू बनून आहेत. हातपंप बसविले गेले असते तर आज संबधीत गाव, पाड्यातील लोकांना स्थानिक ठिकाणीच पाणी उपलब्ध झाले असते.आता तरी गती द्यावीसध्या लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी रोहयोची कामे सुरू झाली आहेत. शासकीय वाहनांना सुट देण्यात येत आहे. त्यामुळे आता पाणी टंचाई उपाययोजनांच्या कामांना गती द्यावी अशी मागणी होत आहे. कागदपत्र रंगविण्याऐवजी थेट निर्णय घेवून कामांचे कार्यादेश द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.४नंदुरबार तालुक्यातील ५७,३२७ लोकसंख्येच्या २४ गावांमध्ये टंचाई आहे. उपाययोजनांमध्ये सर्वच २४ ठिकाणी विहिर अधिग्रहण प्रस्तावीत आहे.४नवापूर तालुक्यातील१२,०१२ लोकख्येंच्या १५ ग्रामपंचायतीची सहा गावे व ९ पाड्यांमध्ये ९ ठिकाणी विहिर अधीग्रहण तर ६ ठिकाणी विंधन विहिर घेण्यात येणार होत्या.शहादा तालुक्यातील २९,०२३ लोकसंख्येच्या १२ गावांमध्ये कुपनलिका खोदण्यात येणार होत्या.अक्लककुवा तालुक्यातील ३,४२४ लोकसंख्येच्या ४ गावांमध्ये चारही ठिकाणी विंधन विहिर खोदण्यात येणार होत्या.धडगाव तालुक्यात १,१२६ लोकसंख्येच्या दोन गावे व दोन पाड्यांमध्ये दोन ठिकाणी विहिर अधिग्रहण तर दोन ठिकाणी टँकर प्रस्तावीत होते.जिल्ह्यात सरासरीचा तब्बल ४२ टक्के अधीक पाऊस झाला असल्यामुळे यंदा जिल्हा टँकरमुक्त राहील असा अंदाज होता. परंतु धडगाव तालुक्यातील गौºयाचा बोदलापडा येथे यंदाही टँकर लागणार आहे.या गावाला एप्रिल महिन्यापासूनच टँकर प्रस्तावीत केले गेले गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे टँकरमुक्तीचे स्वप्नच राहिले. दरवर्षी केवळ याच ठिकाणी टँकर सुरू राहते.