शिर्वे फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 12:53 PM2021-01-22T12:53:18+5:302021-01-22T12:53:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेेत युवक ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी ...

One killed in a tractor collision near Shirve Fateh | शिर्वे फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

शिर्वे फाट्याजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत एक ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा तालुक्यातील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्यमार्गावर ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेेत युवक ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. 
 हेमंत कांतिलाल वसावे (वय २०, रा. भाबलपूर, ता. अक्कलकुवा) असे मयताचे नाव आहे. बुधवारी सकाळी दुचाकीने (क्र. जीजे २१ बीजी ८१२४) उमेश हुपा वळवी व हेमंत कांतिलाल वसावे हे दोघेही तळोद्याकडे येत असताना बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर शिर्वे फाट्याजवळ समाेरून येणाऱ्या ट्रॅक्टरने धडक दिली. धडकेत हेमंत वसावे यास जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर उमेश वळवी हा गंभीर जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत उमेश वळवी याने रात्री उशिरा तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विनानंबर ट्रॅक्टरवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक अभय मोरे करत आहेत.

Web Title: One killed in a tractor collision near Shirve Fateh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.