नवापुरातील अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:32 IST2020-08-06T12:32:31+5:302020-08-06T12:32:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महामार्गावरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या अपघातात ३२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. सायंकाळी ...

नवापुरातील अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : महामार्गावरील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर झालेल्या अपघातात ३२ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला.
पोलीस सुत्रानुसार, नवापूर शहर हद्दीत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील वळण रस्त्यावर संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास धुळे कडून येणारा ट्रेलर (क्रमांक जीजे १२ बीव्ही ८५२८) आणि नवापूर कडून आपल्या गावी उमराण कडे जाणाऱ्या मोटर सायकल (क्रमांक जीजे १९ जे ४७९५) ची समोरा समोर धडक झाली. त्यात सुरेश कांशीराम पाडवी जबर जखमी होउन जागीच मृत झाले. पोलीस उप निरीक्षक नासिर पठाण व पो. कॉ. कृष्णा पवारही घटना स्थळी तातडीने दाखल झालेत. ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले.