शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाच्या ठिबक नळ्या आगीत खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात शेताच्या बांधावर ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील बोरद शिवारात शेताच्या बांधावर ठेवलेल्या सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या ठिबक नळ्यांना माथेफिरुने आग लावल्याची घटना १६ फेब्रुवारीच्या रात्री घडली. दरम्यान, शेती साहित्याचे नुकसान करणाऱ्या माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मोड, ता.तळोदा येथील शेतकरी अंबालाल छगन नवले (मराठे) यांची बोरद शिवारात शेती आहे. सर्वे नंबर २५० मधील शेताच्या बांधावर त्यांनी ठिबक सिंचनसाठी लागणाºया नळ्या गोळा करून ठेवल्या होत्या. सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या पाच हजार मीटर नळ्यांचे बंडल शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याने गोळा करून ठेवले होते. १६ फेब्रुवारीच्या रात्री माथेफिरुने बांधावर ठेवलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांना आग लावली. या आगीत या नळ्या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. याबाबत अंबालाल नवले यांनी बोरद पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली असून पोलीस पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बोरद पोलीस दूरक्षेत्राचे जमादार विजय ठाकरे व हवालदार एकनाथ ठाकरे पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, बोरद व मोड परिसरात कापसासह इतर पिकांची चोरी, उसाला आग लावणे, सबमर्सिबल पंपची केबलसह शेतीसाहित्याची चोरी या घटना नित्याच्या झाल्या असून पोलिसांनी चोरटे व माथेफिरुंचा तपास लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.