तळोदा पालिकेतर्फे ३५ अतिक्रमणधारकांना नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:46 AM2019-12-11T11:46:39+5:302019-12-11T11:47:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तळोदा-चिनोदा रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमीतांची अतिक्रमणे पालिकेने सोमवारी हटविली आहेत. दरम्यान या ...

Notice issued by Taloda Municipality to 3 encroachers | तळोदा पालिकेतर्फे ३५ अतिक्रमणधारकांना नोटीसा

तळोदा पालिकेतर्फे ३५ अतिक्रमणधारकांना नोटीसा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या तळोदा-चिनोदा रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमीतांची अतिक्रमणे पालिकेने सोमवारी हटविली आहेत. दरम्यान या प्रकरणी ३५ अतिक्रमण धारकांना पालिकेने नोटीसादेखील बजाविल्या आहेत. कच्च्या अतिक्रमणाबाबत पालिकेने कारवाई हाती घेतली असली तरी पक्क्या अतिक्रमणाबाबतही ठोस कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तळोदा शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील प्रमुख रस्त्यांकडे किरकोळ व्यावसायिकांनी आपल्या टपºया व लॉºया लावून अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे नगरपालिकेने अशा व्यावसायिकांना नोटीसा बजावून अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि यावर संबनधीतांनी कार्यवाही न केल्यामुळे नगर पालिकेच्याबांधकाम विभागाने सोमवारी अतिक्रमण मोहित हाती घेतली आहे. या पथकाने शहादा व चिनोदा रस्त्यावरील किरकोळ व्यावसायिकांच्या टपºया हटविल्या आहेत. त्यामुळे रस्त्यांनीदेखील मोकळा श्वास घेतला आहे. मंगळवारी पालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम थांबविली असली तरी पुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. याशिवाय अडथळा ठरणाºया सर्वच मार्गावरील अतिक्रमणाबाबत पालिकेमार्फत सर्वेदेखील केला जात असल्याचे पालिकेच्या बांधकाम विभागाने सांगितले आहे. शहरातील रस्त्यांवर अतिक्रमण करणाºया किरकोळ व्यावसायिकांवर पालिकेने कारवाई केली असली तरी शहरात बहुतेक प्रमुख रस्त्यांकडे व्यावसायिकांचे पक्के अतिक्रमणे वाढलेले आहेत.
तत्कालीन प्रशासनाने ही पुढे आलेली अतिक्रमणे काढली होती. मात्र पालिकेचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे ही अतिक्रमणे पुन्हा मोठ्या प्रमाणात पुढे आली आहेत. साहजिकच वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहराचा चेहरा अक्षरश: विद्रूप झाला आहे. पालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी किरकोळ व्यावसायिकांच्या बाबतीत दुजाभाव न करता सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वाहतुकीस अडथळा ठरणाºया पक्या अतिक्रमणांवरही हातोडा चालवावा, अशी सामान्य जनतेची मागणी आहे.

शहरात मोठ्या प्रमाणात किरकोळ व्यावसायिक आहेत. त्यातही लॉरीधारक व टपरीधारकांची संख्या मोठी आहे. व्यावसायिक हे आपल्या लॉºया रस्त्यावरच उभ्या करीत असतात. त्यामुळे नागरिकांना सातत्याने वाहतुकीच्या कोंडीस सामोरे जावे लागत असते. त्यातही नंदुरबार-हातोडा बस मुख्यबाजार पेठेतूनच जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली आहे. त्याचबरोबर मोटारसायकलस्वारदेखील रस्त्याच्या कडेलाच मोटारसायकली उभ्या करीत असतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत अधिकच भर पडत असतो. वाहतुकीच्या अशा कोंडीस नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. मात्र तरीही त्यावर उपाययोजना करायला कोणीही तयार नाही. वास्तविक रस्त्यावर उभ्या राहणाºया किरकोळ लॉरीधारक व टपरीधारकांकडून पालिका रितसर महसूल घेते. साहजिकच त्यांना जागा उपलब्ध करुन देणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु त्यावर कार्यवाही केली जात नाही. पालिकेने त्यांना सक्त ताकीद देवून दुसरीकडे जागा उपलब्ध करुन दिली तर वाहतुकीची ही कटकटदेखील दूर होईल. तथापि यावर प्रशासनाने, पदाधिकाºयांनी सकारात्मक विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Notice issued by Taloda Municipality to 3 encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.