शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:07 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित समस्या निकाली न निघाल्याने ७ डिसेंबरपासून त्यांनी असहकार ...

n  लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी संवर्गाच्या प्रलंबित समस्या निकाली न निघाल्याने ७ डिसेंबरपासून त्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या तळोदा शाखेच्या वतीने पंचायत समिती गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांना निवेदन देण्यात  आले.निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या विविध अभियान, योजना तथा जिल्‍ह्याच्‍या विकासकामासाठी ग्रामसेवक संदर्भात अहवाल तयार असतात. असे असतानाही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी वेळोवेळी पत्रव्यवहार, प्रत्यक्ष सातत्यपूर्ण भेटीगाठी घेऊन त्याबाबत प्रशासनासोबत चर्चा केलेली आहे. परंतु आजतागायत जिल्हा परिषद प्रशासनाला ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न सोडवण्यात यश आलेले नाही किंबहुना ग्रामसेवकांचे सेवाविषयक प्रश्न जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्याची भूमिका प्रशासनाची असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी वर्गात असंतोष पसरला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.२००४मध्ये ग्रामविकास अधिकारी पदावरून विस्तार अधिकारी पदावर झालेल्या पदोन्नती चौकशी अहवालावर कार्यवाही करणे, २३ फेब्रुवारी २०१२ रोजी ग्रामविकास अधिकारी पदावर देण्यात आलेली पदोन्नती चौकशी अहवालानुसार कार्यवाही करणे, १२ वर्ष-२४ वर्ष कालबद्ध पदोन्नती निकाली काढणे व त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षाची कालबद्ध पदोन्नती प्रकरणे निकाली काढणे, सन २००४ मध्ये विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती व २३ फेब्रुवारी २०१२ रोजीच ग्रामविकास अधिकारी या पदावर पदोन्नती या दोन्ही दरम्यान जे कोणी जिल्हा परिषद कर्मचारी गुंतलेले असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही करणे, पंचायत स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नंदुरबार यांची पूर्वपरवानगी न घेता ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे मुख्यालय बदलणाऱ्या गटविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करणे, ग्रामसेवक संघटनेच्या मीटिंग वेळेवर घेणे व सभांच्या इतिवृत्तांच्या नकला अध्यक्ष, सचिव यांना देणे, ज्या ग्रामसेवक व ग्रामविकास यांच्याकडे अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार दिला आहे. त्यांना अतिरिक्त मेहताना वेतनासोबत अदा करणे, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची सेवाज्येष्ठता शासन निर्णय १३ मार्च २०१७ नुसार करणे, पंचायत समिती धडगाव व अक्कलकुवा या अवघड क्षेत्रातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबन करताना मानवतावादी दृष्टिकोन ठेवून    कार्यवाही प्रस्तावित करणे, कोरोना महामारी या विषयावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर निलंबन कार्यवाही न करणे, जिल्हा परिषद व इतर विभागाकडून मंजूर होत असलेले बांधकाम बाबतीत अंदाजपत्रकातील लिड चार्जची तरतूद करणे. तसेच अवैध ठेकेदारीवर बंधन आणणे, बांधकाम विभागातील ऑर्डर देण्याच्या कामातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण आणणे, कोरोना पाॅझिटिव्ह पेशंट ग्रामपंचायत हद्दीत आढळल्यास त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचेकडे फौजदारी दावा दाखल करण्याची सक्ती किंवा दडपण न आणणे, डीसीपीएसच्या हिशोबाच्या पावत्या मिळणे, इत्यादी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या          आहेत. दरम्यान, याबाबत जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर तळोदा ग्रामसेवक युनियनचे के.एम. पावरा, उपाध्यक्ष आर.एच. बोरसे, सचिव एम.पी. कापुरे आदींच्या सह्या आहेत.