शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील नवीन तहसील कार्यालय नागरिकांसाठी ठरतेय गैरसोयीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील मोहिदा रस्त्यावरील नवीन इमारतीत तहसील कार्यालय झाल्याने प्रशासनाची सोय झाली आहे. मात्र नागरिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील मोहिदा रस्त्यावरील नवीन इमारतीत तहसील कार्यालय झाल्याने प्रशासनाची सोय झाली आहे. मात्र नागरिकांच्या दृष्टीने हे कार्यालय गैरसोयीचे ठरू लागले आहे. जनतेचा नियमित संबंध येणारी प्रांताधिकारी, तहसील व दुय्यम निबंधक ही कार्यालये तीन दिशांना असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी फिरफिर करावी लागत आहे. तहसील कार्यालय असलेल्या मध्यवर्ती इमारतीत सर्व कार्यालये कार्यान्वित करण्याची गरज आहे.शहादा तहसील कार्यालयाची जुनी इमारत ब्रिटिशकालीन होती. त्यामुळे या इमारतीचा बराच भाग जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, रेकॉर्डची जपणूक व कामासाठी येणाºया नागरिकांची गैरसोय होत होती. त्या पार्श्वभूमीवर शहराजवळील मोहिदे रस्त्यावर नवीन इमारत बांधून तेथे तहसील कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या इमारतीमुळे प्रशासनाची सोय झाली ही चांगली बाब आहे. मात्र नागरिकांच्या दृष्टीने शहराबाहेरील हे कार्यालय सामान्य जनतेसाठी गैरसोयीचे ठरत आहे. काही दस्तावेजावर प्रांताधिकारी, तहसीलदार व दुय्यम निबंधक यांच्या सह्या आवश्यक असतात. नेमकी ही तिन्ही कार्यालये शहराच्या तीन दिशांना आहेत. नागरिकांना रिक्षाद्वारे प्रवास करून ही कार्यालये गाठून आपली कामे करून घ्यावी लागतात. तहसील कार्यालय मोहिदे रस्त्यावर, दुय्यम निबंधकांचे कार्यालय पटेल रेसिडेन्सीजवळील रचना कॉम्प्लेक्समध्ये तर प्रांताधिकारी कार्यालय वृंदावन नगरमध्ये आहे. या कार्यालयांशी सामान्य जनतेचा नियमित संपर्क येतो. साधे रेशनकार्ड विभक्त करायचे असले तरी जुन्या तहसीलमधून वेंडरकडून कागद घेत तो नवीन तहसीलमध्ये जमा करावा लागतो. जमिनीची खरेदी-विक्री अथवा वाटणी असेल तरी जुने तहसील ते पटेल रेसिडेन्सीजवळ धावाधाव करावी लागते. ग्रामीण भागातून नागरिकांना प्रथम ही कार्यालये शोधण्यासाठीच मोठा वेळ द्यावा लागतो. शिवाय स्वत:च वाहन नसल्यास रिक्षाभाडेचा १०० ते १५० रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसतो. मिळालेल्या माहितीनुसार, दुय्यम निबंधक कार्यालयाची स्वत:ची इमारत नसली तरी जनतेच्या सोयीसाठी नवीन तहसील कार्यालयात या कार्यालयासाठी जागा देता येणे शक्य आहे. किंबहुना तसा प्रयत्नही झाला. मात्र हा प्रयत्न दुय्यम निबंधकांनी धुडकावून लावल्याचे समजते.ग्रामीण भागातून शासकीय कामानिमित्त येणाºया नागरिकांची गैरसोय लक्षात घेता एकाच मध्यवर्ती इमारतीत सामान्य नागरिकांचा दैनंदिन संपर्क येणाी कार्यालये कार्यान्वित करण्याची मागणी होत आहे.नागरिकांची कामे तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय यांच्यासह अप्रत्यक्षपणे स्टॅम्पवेंडर यांच्याशी असतात. नागरिकांना शहादा येथील जुन्या तहसील कार्यालयातून स्टॅम्पवेंडरकडून स्टॅम्प घेऊन तो लिहील्यानंतर सेतूमध्ये जमा करून तहसीलदार अथवा अन्य अधिकाऱ्यांची सही घेण्यासाठी मोहिदा येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जावे लागते. एका कामासाठी १०० रुपये माजावे लागतात. दुय्यम निबंधक कार्यालय हे डोंगरगाव रस्त्यावरील रचना कॉम्प्लेक्समध्ये तिसºया मजल्यावर आहे. तेथे वयोवृद्धांना जमीन, प्लॉट, घर खरेदी-विक्रीसह इतर दस्तावेज नोंदणीसाठी जाणे शक्य होत नाही. त्यामुळे किमान तहसील व दुय्यम निबंधक कार्यालय तरी एका ठिकाणी कार्यान्वित करण्याची गरज आहे.