Nandurbar: बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी टँकर व मिक्सर मशीनच नेले चोरून

By मनोज शेलार | Updated: February 16, 2024 17:07 IST2024-02-16T17:07:19+5:302024-02-16T17:07:52+5:30

Nandurbar Crime News: बांधकाम साईटवरून चोरट्यांनी टँकर व सिमेंट मिक्सर मशीनच चोरून नेल्याची घटना केलपाडा ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Nandurbar: Thieves stole tanker and mixer machine from construction site | Nandurbar: बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी टँकर व मिक्सर मशीनच नेले चोरून

Nandurbar: बांधकामाच्या साईटवरून चोरट्यांनी टँकर व मिक्सर मशीनच नेले चोरून

- मनोज शेलार 
नंदुरबार - बांधकाम साईटवरून चोरट्यांनी टँकर व सिमेंट मिक्सर मशीनच चोरून नेल्याची घटना केलपाडा ता. नवापूर शिवारात घडली. याबाबत नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनुसार, केलपाडा ते खरजे रस्त्यावर खरजेनजीक पुलाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी ठेकेदाराने पाण्याचे टँकर व सिमेंट मिक्सर मशीन आणून ठेवले होते. १४ फेब्रुवारीच्या रात्री चोरट्यांनी टँकर व मशीन चोरून नेले. सकाळी ठेकेदाराच्या लक्षात ही बाब आल्यावर शोधाशोध करण्यात आला, परंतु उपयोग झाला नाही. ९५ हजार रुपये किमतीचे टँकर व एक लाख २० हजार रुपये किमतीचे मिक्सर मशीन असा एकूण दोन लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.
याबाबत ठेकेदार इरफान शेरीफोद्दीन सय्यद (५७) रा. मुसलमान मोहल्ला, नवापूर यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस जमादार प्रमोद वंजारी करीत आहे.

Web Title: Nandurbar: Thieves stole tanker and mixer machine from construction site