Nandurbar: पोलिस वाहन व मालट्रकची समोरासमोर धडक, पोलिस निरिक्षकासह तीन कर्मचारी जखमी
By मनोज शेलार | Updated: March 15, 2023 13:30 IST2023-03-15T13:29:39+5:302023-03-15T13:30:06+5:30
Accident: रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गस्तीवरील पोलीस वाहन आणि मालट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातात पोलिस निरिक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना नंदुरबार-तळोदा रस्त्यावर बुधवारी घडली.

Nandurbar: पोलिस वाहन व मालट्रकची समोरासमोर धडक, पोलिस निरिक्षकासह तीन कर्मचारी जखमी
- मनोज शेलार
नंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात गस्तीवरील पोलीस वाहन आणि मालट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या अपघातातपोलिस निरिक्षकासह तीन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना नंदुरबार-तळोदा रस्त्यावर बुधवारी घडली.
अपघातात नियंत्रण कक्षातील पोलिस निरिक्षक राजेंद्र भावसार व हवालदार कोकणी हे गंभीर जखमी झाले तर दोन पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. जखमींवर नंदुरबार शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस सूत्रांनुसार, नंदुरबार पोलिस दलाचे वाहन (क्रमांक एमएच १२ एसक्यू १०४८) गस्तीवर होते. तळोदा येथून गस्त घालून परत येत असतांना नंदुरबारनजीक समोरून येणाऱ्या मालट्रकने धडक दिली. त्यात पुढे बसलेले पोलिस निरिक्षक राजेंद्र भावसार व हवालदार कोकणी हे गंभीर जखमी झाले. भावसार यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगण्यात आले. कोकणी यांना देखील गंभीर मार लागला आहे. इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.