शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

नंदुरबार पालिका निवडणुक : सत्ताधारी काँग्रेसपुढे भाजपचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:24 PM

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यावेळी या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नंदुरबार पालिकेच्या ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह नवापूर व तळोदा या तिन्ही पालिकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळी मात्र भाजपने काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होत असल्याने यावेळी या निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषत: जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी एक लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याने येथील निवडणूक अधिक प्रतिष्ठेची झाली आहे. पालिका निवडणुकीत माघारीनंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून नंदुरबार पालिकेत काँग्रेस आणि भाजप यांच्यातच सरळ लढत रंगणार आहे. या ठिकाणी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा र}ा रघुवंशी व भाजपचे डॉ.रवींद्र हिरालाल चौधरी यांच्यात अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत रंगत आहे. काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी सर्व जोर लावला आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे स्वत: प्रत्येक मतदाराच्या भेटीगाठी घेत असून कॉर्नर सभांवरही भर दिला आहे. गेल्या पाच वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांर्पयत पोहचविण्यासाठी त्यांचे प्रय} आहेत.  गेल्या पाच वर्षाच्या काळात शहर विकासाच्या 200 कोटींपेक्षा अधीक योजना व कामांची जंत्री ते लोकांपुढे मांडत आहेत. दुसरीकडे भाजपतर्फे डॉ.रवींद्र चौधरी यांच्या बरोबरच खासदार डॉ.हिना गावीत, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार शरिष चौधरी, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीसह कॉर्नर सभांवर त्यांचाही भर आहे. डॉ.विजयकुमार गावीत हे आपल्या जाहिर सभांमधून नंदुरबारच्या विकासासाठी आपणही निधी मिळवून देण्यासाठी काय प्रय} केले त्याची माहिती सांगत असून खासदारांच्या माध्यमातून परिसरात व जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने पालिकेचीही सत्ता मिळाल्यास विकासाला गती येईल असे मतदारांना पटवून देण्यासाठी त्यांचा प्रय} आहे. उमेदवार डॉ.रवींद्र चौधरी स्वत: उद्योजक असल्याने शहरातील बेरोजगार युवकांसाठी उद्योगाच्या माध्यमातून रोजगार देण्याचा मुद्यावर त्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. याशिवाय भाजपतर्फे विविध आरोपांचा पाढा वाचला जात आहे.भाजप आणि काँग्रेसचा या प्रतिष्ठेच्या लढतीत उर्वरित पाच उमेदवारांची भुमिका महत्त्वाची ठरत आहे. कारण या पाचपैकी दोन उमेदवार अर्थात एमआयएमचे सैय्यद रफअत व राष्ट्रवादीचे शेख आरिफ कमर हे मुस्लिम समाजातील आहेत. विशेष म्हणजे शहरातील एक लाख मतदारांपैकी 25 हजारापेक्षा अधीक मतदार मुस्लिम आहेत. त्यामुळे या उमेदवारांना मिळणा:या मताधिक्यावरही काँग्रेस आणि भाजपच्या विजयाचे समिकरण अवलंबून असल्याने त्याकडेही विशेष लक्ष आहे.प्रचारात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची प्रचंड यंत्रणा कामाला लागली आहे. रिक्षावरील ध्वनीक्षेपक, एलईडी स्क्रिन, तीनचाकी सायकलच्या माध्यमातून लक्षवेधी प्रचार सुरू आहे. प्रचारातील गितांनी तर अतिरेक केला आहे. त्यामुळे एकुणच नंदुरबार शहरातील वातावरण अक्षरश: ढवळून निघाले आहे.नवापूर, तळोद्यात तिरंगीनंदुरबारच्या प्रचाराच्या वातावरणाच्या तुलनेत नवापूर आणि तळोद्यात प्रचार यंत्रणा फारशी सक्रीय नसल्याचे चित्र आहे. या दोन्ही ठिकाणी प्रचार सुरू आहे. प्रचार रॅली किंवा कॉर्नर सभा होत आहेत. पण नंदुरबारच्या तुलनेत कमी आहे.तळोद्यात काँग्रेसचे भरत माळी, भाजपचे अजय परदेशी व राष्ट्रवादीचे देवेंद्र जोहरी यांच्यात तिरंगी लढत आहे. या ठिकाणी देखील काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे उमेदवार भरत माळी हे पूर्वी नगराध्यक्ष होते परंतु त्यांना अपात्र ठरविल्याने अडिच वर्षापासून तेथे त्यांच्याच मर्जीतील काँग्रेसच्याच र}ा चौधरी या नगराध्यक्षपदाचे कामकाज सांभाळत होते. आता ते पुन्हा स्वत: निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी देखील विकासाचा मुद्दा घेवून प्रचार सुरू केला आहे. भाजपचे अजय परदेशी यांनी त्यांना कडवे आव्हान दिले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्तेच्या बळावर विकास कामे करण्याचे ते आश्वासन देत आहे. राष्ट्रवादीने देखील येथे उमेदवार दिला असून या ठिकाणी या पक्षाचेही प्राबल्य असल्याने तिरंगी लढत होत आहे.नवापूर मध्ये देखील काँग्रेसतर्फे हेमलता अजय परदेशी, राष्ट्रवादीतर्फे अर्चना नगराळे तर भाजपतर्फे ज्योती जयस्वाल हे रिंगणात आहेत. येथे एकुण सहा उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत तिघांमध्येच आहे. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा युवानेते शिरिष नाईक व भरत गावीत यांनी स्विकारली असून केलेल्या विकास कामांच्या बळावर ते ही निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी मागील थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे कै.गोविंदराव वसावे हे विजयी झाले होते. त्यांच्यानंतर गेल्या दोन, तीन वर्षापासून नरेंद्र नगराळे यांनी धूरा स्विकारीत पालिकेत विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून चांगला जम बसविला होता. त्यांच्याच प}ी अर्चना वळवी-नगराळे या निवडणूक लढवीत असल्याने त्या निवडणुकीच्या स्पर्धेत आल्या आहेत. त्यांच्या प्रचाराची धूरा माजी आमदार शरद गावीत यांनी स्विकारली आहे. भाजपचा या ठिकाणी मागील काळात पालिकेत फारसा प्रभाव नसला तरी केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर भाजप कार्यकत्र्यामध्ये येथे उत्साह आला आहे. शिवाय खासदार डॉ.हिना गावीत या स्वत: येथे प्रचाराची धूरा सांभाळत असल्याने भाजपचे उमेदवारही येथे स्पर्धेत आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत रंगत आहे.एकुणच निवडणुकीला अद्याप आठ दिवस बाकी असल्याने या आठ दिवसाच्या प्रचारात आपल्या भुमिका प्रभावीपणे मतदारांर्पयत कोण पोहचविणार त्यावर तिन्ही ठिकाणच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.