शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

नंदुरबार चकाकणार आता सौर ऊज्रेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 12:33 IST

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : पथदिव्यांचे महिन्याचे 25 लाख रुपयांचे वीज बिल कमी व्हावे व्हावे व पालिकेवरील आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी पालिकेतर्फे पाच मेगाव्ॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी साक्री रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहालगतची जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारी नंदुरबार ही ...

मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 26 : पथदिव्यांचे महिन्याचे 25 लाख रुपयांचे वीज बिल कमी व्हावे व्हावे व पालिकेवरील आर्थिक बोजा कमी व्हावा यासाठी पालिकेतर्फे पाच मेगाव्ॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. यासाठी साक्री रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहालगतची जागा जवळपास निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प उभारणारी नंदुरबार ही उत्तर महाराष्ट्रातील एकमेव नगरपालिका ठरणार आहे.नंदुरबार पालिकेचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या पाहता पथदिवे आणि इतर बाबींचे वीज बिल मोठय़ा प्रमाणावर येते. पूर्वीपेक्षा वीज बिल तब्बल 35 ते 40 टक्क्यांनी वाढले आहे. यामुळे पालिकेचा आर्थिक डोलारा ढासळत असल्याचे चित्र होते. यावर उपाय म्हणून पालिकेने आता थेट सौर ऊज्रेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. पाच मेगाव्ॉटचा प्रकल्प साकारला जाणार आहे.पोषक वातावरणनंदुरबारसह परिसर हा सौर ऊज्रेला पोषक आहे. तालुक्याच्या सीमेलगतच साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे राज्यातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहे. त्यामुळे पालिकेनेदेखील सौर ऊज्रेलाच प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अशा प्रकारच्या प्रकल्पांची माहिती घेतली. असे प्रकल्प कितपत आणि कसे उपयोगी आहेत याची माहिती घेतली. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे त्यांनी मार्गदर्शन घेतले. त्यानुसार हा प्रकल्प राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.जागा निश्चितीसौर ऊर्जा प्रकल्पासाठी सर्वात उपयोगी आणि फायदेशीर जागा ही सद्य:स्थितीत साक्री रस्त्यावरील मध्यवर्ती कारागृहाच्या शेजारील जागा आहे. आणखी इतरही काही जागांची पाहणी केली जात आहे. दिवसभर आणि सायंकाळीदेखील सौर प्लेटवर सूर्यकिरणे पोहचू शकतील हा त्यामागचा उद्देश आहे. त्या दृष्टीने तज्ज्ञांनी काही जागांची पाहणीदेखील केली. सरकारी जागा मिळाली नाही तर खासगी जागा भाडय़ाने घेण्याचीही पालिकेची तयारी आहे.शहरातील पथदिवेशहराचा विस्तार साधारणत: तीन ते चार किलोमीटर परिघात पसरला आहे. अनेक नवीन वसाहती तयार होत आहेत. सर्वच भागात विद्युत पोल, पथदिवे बसविण्यासाठी प्रयत्न आहेत. सद्य:स्थितीत पाच हजार 500 विद्युत पोलवर सात हजार पथदिवे शहरात आहेत. याशिवाय 20 मीटर उंचीचे पाच हायमास्ट लॅम्प आणि 40 पेक्षा अधिक मिनी हायमास्ट लॅम्प आहेत. या सर्वाचा वीज बिलांचा खर्च हा महिन्याला 25 लाखांर्पयत जात असतो.