बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले
By मनोज शेलार | Updated: June 17, 2024 18:57 IST2024-06-17T18:57:07+5:302024-06-17T18:57:40+5:30
याप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको केला.

बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणाऱ्या युवकांना डंपरने चिरडले
नंदुरबार :बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी नातेइकांकडे जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला भरधाव डंपरने चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना खापर, ता. अक्कलकुवानजीक सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी संतप्त नातेवाइकांनी बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको केला.
हमजा शरीफ मक्राणी (१६), रेहान रज्जाक पठाण (१६) दोघे रा. सेलंबा (गुजरात) असे मयतांची नावे आहेत. सेलंबा येथून दोघे युवक आपल्या दुचाकीने (क्रमांक जीजे.१ पीजी. ००२३) अक्कलकुवा येथे नातेवाइकांना शुभेच्छा देण्यासाठी महामार्गावरून जात होते. कौली गावाच्या फाट्याजवळ मागून आलेल्या भरधाव डंपरने दोघा युवकांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. संतप्त नातेवाईक व जमावाने महामार्गावर रास्ता रोको केल्याने एक तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले. अक्कलकुवा पोलिसात डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईदच्या दिवशीच मुस्लिम कुटुंबियांवर शोककळा पसरली होती.