Nandurbar: सिसा येथे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई, गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Updated: June 29, 2024 19:43 IST2024-06-29T19:42:59+5:302024-06-29T19:43:26+5:30
Nandurbar: सिसा, ता. धडगाव येथे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar: सिसा येथे बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई, गुन्हा दाखल
- मनोज शेलार
नंदुरबार - सिसा, ता. धडगाव येथे कुठलेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसताना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिसा येथील ग्रामस्थांनी तालुका आरोग्य अधिकारी व तहसीलदारांकडे तक्रार केली होती. सिसा (ता. धडगाव) येथील राजा इरमा ठाकरे व दिनेश राजा पाडवी यांच्या मालकीच्या घरात रिदय देवनाथ विश्वास (रा. सबदालपूर अरंगघाटा नारणपूर, पो. अरंगघाटा, जि. नाडिया (प. बंगाल), ह.मु. सिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) हा कुठलेही वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र नसताना अथवा डिग्री नसताना बेकायदेशीररीत्या वैद्यकीय व्यवसाय करताना मिळून आला.
विश्वास हा लोकांची फसवणूक करून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत होता. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिदय देवनाथ विश्वास याच्याविरुद्ध फसवणूक व वैद्यकीय व्यवसाय अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल पाटील करीत आहेत.