Nandurbar: अल्पवयीन युवतीने गळफास लावून संपवलं जीवन

By मनोज शेलार | Updated: May 24, 2023 17:39 IST2023-05-24T17:38:26+5:302023-05-24T17:39:25+5:30

Nandurbar: अल्पवयीन युवतीने झाडाला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मोलगीचा ओलोदोपाडा (ता. अक्कलकुवा) येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Nandurbar: A minor girl ends her life by hanging herself | Nandurbar: अल्पवयीन युवतीने गळफास लावून संपवलं जीवन

Nandurbar: अल्पवयीन युवतीने गळफास लावून संपवलं जीवन

- मनोज शेलार 
नंदुरबार : अल्पवयीन युवतीने झाडाला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मोलगीचा ओलोदोपाडा (ता. अक्कलकुवा) येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रानुसार, इयत्ता नववीत शिकणारी १५ वर्षीय युवतीने घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेतला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुटुंबीयांना ही बाब समजताच एकच आक्रोश केला. या घटनेमुळे गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मोलगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तपास हवालदार चेतन साळवे करीत आहेत.

Web Title: Nandurbar: A minor girl ends her life by hanging herself