शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेविक पूत्राच्या राडय़ाचे पालिका सभेत पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 21:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मंगळवारी पालिकेत झालेल्या तोडफोड प्रकरणी नगराध्यक्षांनी निषेध नोंदविण्याच्या मुद्दयावरून पालिका सभेत काही काळ गोंधळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मंगळवारी पालिकेत झालेल्या तोडफोड प्रकरणी नगराध्यक्षांनी निषेध नोंदविण्याच्या मुद्दयावरून पालिका सभेत काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. अखेर बांधकाम सभापतींनी बाजू मांडल्यानंतर वाद शमला. सभेत एकुण नऊ विषयांना मंजुरी देण्यात आली. दरम्यान, मंगळवारच्या घटनेच्या पाश्र्वभुमीवर सभेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी सकाळी 11 वाजता झाली. अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान होते. प्रभारी मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्यासह सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक उपस्थित होते. बैठकीच्या अजेंडय़ावर एकुण नऊ विषय होते. पैकी काही विषयांवर विरोधकांनी आक्षेप घेत विरोध केला. बैठकीच्या शेवटी प्रभारी नगराध्यक्ष परवेजखान यांनी मंगळवारी भाजप नगरसेविकेच्या पूत्राने पालिकेत घातलेल्या धुडगूसचा निषेध नोंदविला. त्याला भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. संबधीत युवकाचा तोल का सुटला याचाही विचार करावा, एकतर्फी निषेध नोंदविण्याऐवजी कारभारात सुधारणा कराव्या असे विरोधी नगरसेवकांनी सांगितले. त्यावरून सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दोन्ही गटातील नगरसेवक डायसजवळ आल्याने परिस्थिती गोंधळाची झाली. यातच काही नगरसेवकांनी तेथून काढता पाय घेतला. बांधकाम समिती सभापती कुणाल वसावे यांनी बाजू मांडण्याचा प्रय} केला. कुठले काम अडले, कोणते बाकी आहे याबाबत आपल्याशी चर्चा केली असती तर समाधानकारक तोडगा निघाला असता. परंतु लक्ष्मण माळी यांनी थेट आपल्याच दालनाला कुलूप लावले. नगराध्यक्षांच्या केबीनची तोडफोड केली हे कुणीही सहन करणार नाही. संबधीत युवकाच्या आई अर्थात नगरसेविका यांनीही कोणती कामे थांबली, रखडली याची माहिती दिली. कामाच्या ठिकाणी येण्याचेही त्यांनी वसावे यांना सांगितले.  त्यानंतर वादावर पडदा पडला. विषय पत्रिकेवरील आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश पारित करण्याच्या मुद्यावरून विरोधी नगरसेवकांनी सत्ताधारींना चांगलेच धारेवर धरले. बांधकाम अभियंत्यांना याबाबत स्पष्टीकरण करायला लावण्यास भाग पाडले. पालिका हद्दीतील स.नं.135/2/3 व स.नं.73/1/ब/2, 73/6-1, 73-6-2 हे प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान याचे आरक्षण व्यपगत झाल्याचे आदेश पारीत करण्याचा मुद्दा होता. त्यावर विरोधी नगरसेवक चारूदत्त कळवणकर यांनी काही व्यक्ती असे भुखंड खरेदी- विक्री करून स्वत:चे हित पहात असल्याचे सांगितले. संबधीत जागा मालक कोण, त्यांचे नाव जाहीर करण्यासही त्यांनी भाग पाडले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ओडीएफ व स्टार रेटींगसाठी पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक शौचालयांमध्ये सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या खर्चास मान्यता देण्याच्या प्रश्नावर देखील विरोधकांनी आक्षेप घेतला. याशिवाय इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीसंदर्भात उत्सूकता लक्षात घेता मोठय़ा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरिक्षक नंदवाळकर, उपनिरिक्षक पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तैणात होते.