शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

20 हजारापेक्षा अधीक मूर्त्ीनी घेतलाय आकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दोन आठवडय़ांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाकरीता मूर्ती घडविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये रात्रदिवस सुरू आहे. जवळपास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दोन आठवडय़ांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाकरीता मूर्ती घडविण्याचे काम येथील कारखान्यांमध्ये रात्रदिवस सुरू आहे. जवळपास 20 हजारापेक्षा अधीक लहान, मोठय़ा मूर्ती आकारास आल्या आहेत. हजारो हात 24 तास राबत आहेत.येत्या 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेल्या हजारो लहान, मोठय़ा मूर्तींवर अखेरचा हात फिरविला जाऊ लागला आहे.  आधीच बुकींग केलेल्या मूर्ती तयार करून त्या मंडळांना सोपविण्याची जबाबदारी मूर्ती कारागिरांवर असल्याने त्या कामाला पहिले प्राधान्य दिले जात आहे. येत्या 15 दिवसात येथील मूर्ती उद्योगातून लाखो रुपयांची उलाढाल होणार आहे. नंदुरबारातील मूर्ती उद्योगाला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अशाही स्थितीतून सावरत हा उद्योग पुन्हा उभा राहिला आहे. त्यामुळे सुरुवातीला असलेले मंदीचे सावट दूर होऊन एक चैतन्यय निर्माण झाले आहे. नंदुरबारचा गणेशोत्सव जसा प्रसिद्ध आहे तसा येथील मूर्ती उद्योग देखील राज्यात प्रसिद्ध आहे.तब्बल 65 ते 70 वर्षाची परंपरा लाभलेल्या येथील उद्योगाला आता ग्लोबल टच मिळू लागला आहे.20 हजारापेक्षा अधीक मूर्ती घेताहेत आकारनंदुरबारात मूर्ती बनविणारे लहान मोठे 30 ते 35 कारखाने आहेत. शिवाय काही घरगुती मूर्ती बनविणारे कारागिर देखील आहेत. जून महिन्यापासून या कारखान्यांमध्ये कामाला सुरूवात होते. शेकडो हात तीन ते चार महिने राबत असतात. पूर्वी नंदुरबारात मोजकेच कारागिर होते. त्यांच्या हाताच्या कलेने येथील मूर्ती व्यवसाय नावारूपाला आला. हळूहळू अनेकजण त्यात उतरले. काहीजण मोठय़ा मूर्तीकारागिराकडे शिकून स्वत:चा कारखाना सुरू केला तर काही व्यवसाय म्हणून यात उतरले आहेत. शहरातील गल्लोगल्ली असलेले कारखाने आणि घरगुती उद्योगातून तयार होणा:या मूर्त्ीची संख्या 25 हजारांपेक्षा अधीक जाते. त्यातून तीन महिन्यात करोडोंची उलाढाल होत असते.इतर राज्यातूनही मागणीनंदुरबारच्या मूर्तीला राज्याप्रमाणे गुजरात व मध्यप्रदेशातून देखील मोठी मागणी आहे. या दोन्ही राज्यातील मंडळे दोन ते तीन महिने आधीच मूर्ती बुकींग करतात. शिवाय त्यांना जशी मूर्ती लागेल तशी ते बनवून देखील घेतात. राज्यापेक्षा या गुजरात व मध्यप्रदेशात विक्री होणा:या मूर्त्ीचे प्रमाण अधीक आहे.परप्रांतिय होणार दाखलयेथील मूर्ती उद्योगाला आता परप्रांतिय कारागिरांच्या अतिक्रमणालाही तोंड द्यावे लागत आहे. बाहेरून येणारे कारागिर साच्यात बनविलेल्या मूर्ती येथे विक्रीस आणतात. कमी किंमतीत असलेल्या या मूर्त्ीमुळे स्थानिक मूर्ती व्यवसायिकांच्या व्यवसायावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे परप्रांतिय मूर्तीकारांना शहराबाहेर मूर्ती विक्रीसाठी सक्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असली तरी त्याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. यंदा पीक पाणी चांगले होते, परंतु अतिवृष्टीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याने आणि संततधार पावसामुळे यंदा मूर्ती उद्योगावर परिणाम झाला. परिणामी यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत केवळ 70 टक्केच मागणी असल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे.कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या असल्यामुळे मूर्तीच्या किंमती देखील वाढविण्याची तयारी कारागिरांनी केली होती. परंतु अपेक्षीत मागणीच नसल्यामुळे आहे त्या किंमतीतच कारागिरांना मूर्ती विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे.