शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

देश विकासासाठी मोदी सरकार अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोदी सरकारने वर्षभरात विविध ऐतिहासिक निर्णय घेवून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी पुढचे पाऊल टाकले आहे. कोरोनाच्या तीन महिन्याच्या काळात खंबीर भुमिका घेवून इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा फैलाव रोखने आणि मृत्यूदर कमी राखण्यात देखील मोदी सरकारने यश मिळविल्याचा दावा खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषदेत केला.मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभराच्या काळात घेतलेले निर्णय, कोरोना महामारीच्या संदर्भातील केंद्र शासनाच्या उपाययोजना याची माहिती देण्यासाठी खासदार डॉ.हिना गावीत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते. त्यांनी सांगितले, गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेक महत्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतले आहेत. सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे घटनेचे कलम ३७० हटविण्यात आले. जम्मू आणि कश्मिरमध्ये भारताचे संविधान त्यामुळे पुर्णपणे लागू झाले.लड्डाख आणि जम्मू-कश्मिर हे दोन केंद्र शासीत प्रदेश निर्माण झाले. राम मंदीराचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घेताच न्यास स्थापन करून मंदीर उभारणीच्या कामाला चालना दिली.तिहेरी तलाक रद्द केले. नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ लागू केला. दहशतवादावर कठोर कारवाईसाठी सुधारणा विधेयक मंजूर केले. बँकांचे विलीनिकरण, चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, अटल भूजल योजना, प्रधानमंत्री किसान पेन्शन योजना यासह इतर महत्वाचे निर्णय घेवून देश विकासाला चालना दिल्याचे त्यांनी सांगितले.कोरोना फैलाव रोखण्यात, त्याचा मृत्यूदर कमी राखण्यात, जास्तीत जास्त कोरोना चाचणी घेण्यात देश आघाडीवर राहिला. एन-९५ व पीपीई किट तयार करण्यात भारत आत्मनिर्भर झाला. प्रगत देशाच्या तुलनेत भारतातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. १४ देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे.लॉकडाऊनच्या काळात एक लाख ७० हजार कोटी रुपयांचे पॅकेज, धान्य वाटप, ८ कोटी घरांमध्ये तीन गॅस सिलींडर मोफत देणे, मनरेगाच्या अंतर्गत १३ कोटी ६२ लाख कुटूंबांना लाभ दिला गेला. ३८० श्रमिक ट्रेन चालवून ५२ लाख स्थलांतरीतांना त्यांच्या भागात पोहचविले. लॉकडाऊनपूर्वी १४४४ भारतीय नागरिकांना भारतात आणल्याचे त्यांनी सांगितले.