लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रस्त्यावर गतिरोधक बसविण्याच्या वादातून काकडखुंट, ता.अक्कलकुवा येथे जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली.काकडखुंट ते लालपूर या रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात येत होते. त्या वादातून विनोद जत्र्या वळवी व अक्षय वळवी यांच्यात वाद झाला. यावेळी जमावाने विनोद वळवी यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या तक्रारीवरून अक्षय वळवी, विजय वसावे, अश्विनी वसावे, कांतिलाल वसावे, संजय वसावे, कपिल वळवी सर्व रा.काकडखुंट, ता.जळगाव यांच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}