शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
2
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
3
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
4
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
5
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
6
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
7
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
8
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
9
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
10
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
11
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
12
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
13
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
14
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
15
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
16
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
20
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
Daily Top 2Weekly Top 5

चिखली येथे नर्मदा जीवन शाळांच्या विद्यार्थ्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:32 IST

नर्मदा नवनिर्माण अभियानामार्फत सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साधारण १३ जीवन शाळा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या शाळांमध्ये या ...

नर्मदा नवनिर्माण अभियानामार्फत सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साधारण १३ जीवन शाळा सुरू आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण दिले जाते. या मुला-मुलींच्या कलागुणांबरोबरच विविध खेळांच्या स्पर्धांसाठी या जीवन शाळांचा बालमेळावा आयोजित करण्यात येतो. यंदाच्या २३ व्या बाल मेळाव्याचे आयोजन चिखली पुनर्वसन, ता.शहादा येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर, सई तांबे, असलम बागवान, हनीफ तडवी, स्मिता तांदळे, सुवर्णा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी गावातून आदिवासी पारंपरिक वाद्याने विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी रॅली काढली. या रॅलीत विविध घोषणा देण्यात आल्याने चिखली परिसरातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले होते. या वेळी प्रमुख पाहुण्यांनी शासनाच्या कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय जीवन शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्यातील कलागुण पाहून तोंड भरून कौतुक केले. सई तंबे, असलम बागवान व मेधा पाटकर यांनी मार्गदर्शन केले.

जीवन शाळांमधील विद्यार्थिनींनी आपल्या हस्तकलेतून विविध वस्तू तयार केल्या आहेत. या वस्तूंचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. खो-खो, कबड्डी, मल्लखांब अशा वेगवेगळ्या मैदानी स्पर्धांसह इतर अनेक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमही मेळाव्यात होणार आहे. कार्यक्रमास पं.स.च्या माजी सभापती वनिता पटले, युवराज भटकळ, प्रसाद अग्रवाल, प्रवीण तडवी, प्रियंका तुपे, बिस्मिल्ला सायद, मारुती कंदारे, मनीषा देशपांडे, कमल यादव, श्याम मदाने, प्रा.जयपाल शिंदे आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन चेतन साळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी लतिका राजपूत, खेमसिंग पावरा, दिनेश पाडवी, महेंद्र तोमार, तुकाराम पावरा यांच्यासह जीवन शाळेतील शिक्षक परिश्रम घेत आहेत.