पॉझीटिव्ह रूग्णाचा संपर्क आल्याने मोडला उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 12:49 IST2020-07-10T12:49:33+5:302020-07-10T12:49:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : गृहकर्जाच्या तपासासाठी आलेला आरोग्य कर्मचारी पॉझीटिव्ह आढळल्याने मोड, ता.तळोदा येथे खळबळ उडाली आहे. गावात ...

पॉझीटिव्ह रूग्णाचा संपर्क आल्याने मोडला उपाययोजना
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : गृहकर्जाच्या तपासासाठी आलेला आरोग्य कर्मचारी पॉझीटिव्ह आढळल्याने मोड, ता.तळोदा येथे खळबळ उडाली आहे. गावात तातडीने उपाययोजना करण्यात आल्या.
मोड, ता.तळोदा येथील महाराष्टÑ ग्रामीण बँकेत आरोग्य विभागाचा कर्मचारी घेतलेल्या गृहकर्जाच्या तपासासाठी आला होता. या वेळी त्याने बॅकेचे मॅनेजर प्रतीक्ष बागल यांच्याशी कर्जा संदर्भात चर्चा करून नंदुरबार येथील सिव्हील हॉस्पीटलला स्वत:चा स्वॅब दिला. दरम्यान त्याचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यास कर्जासंदर्भात माहिती दिली असता या आरोग्य कर्मचाºयाने मी जिल्हा रूग्णालयात क्वॉरंटाईन असल्याचे सांगितले. या वेळी मॅनेजर यांनी सरपंच जयसिंग माळी यांना घटनेचे वृत्त देताच गुरूवारी बँकेकडे जाणारा मार्ग बंद केला. तसेच गावात ध्वनीक्षेपाद्वारे सूचना देत गाव तीन दिवस बंद करण्यात येत असल्याचेही सांगितले. तसेच बँकेत व परिसरात निर्जंतुक फवारणी करण्यात आली. दरम्यान, तहसीलदार पंकज लोखंडे यांना घटनेचे माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तत्काळ आरोग्य केंद्राचे पथक पाठवून तपासणी करण्याचे आदेश दिले. तसेच संपूर्ण गावात निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिली.
या वेळी बँकेतील कर्मचाºयांची आमलाड येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामस्थांना आवश्यक कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे सूचित केले. याप्रसंगी प्रांताधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोंखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार रामजी राठोड, श्रीकांत लोमटे, डॉ.महेंद्र चव्हाण, डॉ.रखो शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी भेट देवून पाहणी केली. या वेळी ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा, गुलाबसिंग गिरासे, डॉ.नंदकिशोर चौधरी, डॉ.छोटू चौधरी उपस्थित होते.