कुकावल येथील विवाहितेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:59 IST2021-03-04T04:59:40+5:302021-03-04T04:59:40+5:30
शितल अमृत भदाणे असे मयत महिलेचे नाव आहे. २८ रोजी कुकावल येथे लग्न समारंभानिमित्त अमृत प्रभाकर भदाणे व शीतल ...

कुकावल येथील विवाहितेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू
शितल अमृत भदाणे असे मयत महिलेचे नाव आहे. २८ रोजी कुकावल येथे लग्न समारंभानिमित्त अमृत प्रभाकर भदाणे व शीतल अमृत भदाणे (रा.हातनूर ह.मु.सुरत) हे दोघे जण आले होते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर सायंकाळी सुरत जाण्यासाठी निघत असतांना दशरथ गिरधर पाटील व युवराज राजधर पाटील या दोघांनी मुलगी व जावयांना निमगूळ येथे सोडले. दोघेही याठिकाणी वाहनाची वाट पाहत असतांना रस्त्याच्या कडेला उभे होते. दरम्यान भरधाव वेगात आलेल्या एमएच.४३ बीजी ७१५२ या ट्रकने पती-पत्नीला धडक दिली. यात शीतल यांना गंभीर दुखापत झाली. दोघांना दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात होते. याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती अमृत भदाणे हे अपघातात जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेमुळे कुकावल परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.