शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानक हेरिटेज ऐवजी मॉडेल स्थानक बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक हेरिटेज बनविण्यापेक्षा ते मॉडेल स्थानक बनवावे, भविष्याचा विचार करावा, केवळ भावनेच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार रेल्वे स्थानक हेरिटेज बनविण्यापेक्षा ते मॉडेल स्थानक बनवावे, भविष्याचा विचार करावा, केवळ भावनेच्या मागे धावून उपयोग नाही. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभिर्याने घेवून सुरू असलेले काम हे मॉडेल स्थानकाप्रमाणे करावे अशी मागणी प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.याबाबत संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरत-भुसावल रेल्वेमार्ग डबल लाईन अनेक दिवसांपासून सुरु आहे. या डबल लाईनमुळे छोटे-छोटे स्टेशन भव्य-दिव्य झालेत. पण मात्र नंदुरबारला मुख्य थांबा असूनही जुनीच इमारत ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला हेरिटेज हे गोंडस नाव देण्यात आले आहे. या जुन्या इमारतीत कुठलीच सुविधा उपलब्ध नाही. तिकीट खिडकी अत्यंत लहान असून जनरल वेटींग रुम पूर्ण नसल्याने तसेच बुकींग आॅफीस, महिलांना शौचालय, व्हीआयपी वेटींग रुम यांची जागा आज पूर्णपणे अयोग्य असल्याने भविष्याचा विचार करुन नवीन रेल्वे स्टेशन बनविणे काळाची गरज आहे. निव्वळ हेरिटेजच्या नावाखाली इंग्रजांचे दगडं सांभाळत बसण्यात अर्थ नाही. आजच्या इमारतीच्या भिंती पाहिल्या तर दोन-दोन फुटाच्या आहेत. हे तोडून नवीन बनविले तर एकाच जागेवर सर्व सुविधा उपलब्ध होतील व कायद्याचे पालन केले जाईल.जुन्या इमारतीला ठेवणे म्हणजे भविष्यात प्रवाशांना व कर्मचाºयांना रोज अडचणीचा सामना करावा लागण्याचा हा प्रकार आहे. इमारत नवीन बनविली तर शंभर वर्षांपर्यंत प्रवाशांना व कर्मचाºयांना त्रास होणार नाही. हेरिटेजच ठेवायचे असेल तर नव्या इमारतीला तसा आकार किवा तशी डिझाईन द्यावी. परंतु निव्वळ भावनाशिल मुद्दा न करता व्यवहारिकतेची सांगड घालावी व नवीन रेल्वे स्थानकात सर्वसुविधा उपलब्ध करून द्याव्या. असेही या निवेदनात प्रवासी संघटनेचे स्पष्ट केले आहे.