शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 20:30 IST

Nandurbar ZP Election 2020 : राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे.

नंदुरबार - नुकत्याच आटोपलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीती मतमोजणी सुरू असून, या मतमोजणीमधून अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत. राज्य मंत्रिमंडळातील आदिवासी विकासमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांनाही जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांमध्ये मोठा धक्का बसला आहे. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. नंदुरबारमधील काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांपैकी एक असलेल्या के. सी. पाडवी यांना त्यांच्या तोरणमाळ या बालेकिल्ल्यामध्येच धक्का बसला आहे. तोरणमाळ जिल्हा परिषद गटामध्ये पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा पराभव झाला आहे. शिवसेना उमेदवार गणेश पराडगे यांनी हेमलता पाडवी यांना पराभूत केले आहे. पाडवींचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतविभागणी होऊन त्याचा फायदा शिवसेना उमेदवाराला झाल्याचे सांगण्यात येत आहे. Maharashtra Cabinet Expansion : राज्यपाल कोश्यारी संतापले; काँग्रेस नेत्याला पुन्हा घ्यायला लावली शपथZP Election 2020: धुळ्यात भाजपाची सत्तेकडे वाटचाल, १९ जागांवर विजय

Maharashtra Zilla Parishad Result Live: धुळ्यात भाजपाची सरशी पण नागपुरात नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळेंना धक्का!

मात्र असे असले तरी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. तर भाजपा दुसऱ्या आणि शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :K. C. Padaviके. सी. पाडवीcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणZP Electionजिल्हा परिषद