शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये भाजपा-काँग्रेस समसमान, पण 'कमळा'ने केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:53 IST

Nandurbar ZP Election 2020 : एकूण 56 जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 23 जागा मिळाल्या आहेत. तर 7 जागा जिंकणारी सिवेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

नंदुरबार - नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व निकाल हाती आले असून, एकूण 56 जागा असलेल्या जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नाही. प्रत्येकी 23 जागा जिंकत भाजपा आणि काँग्रेस सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र गेल्या वेळी केवळ एक जागा जिंकणाऱ्या भाजपाने 23 जागा जिंकत यावेळी जोरदार मुसंडी मारली आहे. तर काँग्रेसची काहीशी पीछेहाट झाली आहे. 2013 मध्ये झालेल्या नंदुरबारच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने 29 तर राष्ट्रवादी काँग्रेसने 25 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली होती. तर अपक्षांच्या खात्यात एक जागा गेली होती. शिवसेनेला मात्र त्या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. मात्र यावेळी मोठी उलथापालथ झाली असून, काँग्रेसला बहुमत गमवावे लागले आहे. काँग्रसचे ज्येष्ठ नेते असलेल्या के. सी. पाडवी यांच्या पत्नीलाही पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या निवडणुकीत 25 जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचीही मोठी पीछेहाट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 3 जागा जिंतका आल्या आहेत. दुसरीकडे भाजपाने मात्र जोरदार मुसंडी मारत 23 जागा पटकवल्या आहेत. 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ एक जागा जिंकता आली होती. यावेळी मात्र भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर गेल्यावेळी भोपळाही फोडू न शकलेल्या शिवसेनेने यावेळी मात्र 7 जागा जिंकल्या आहे. त्यातही शिवसेना उमेदवाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांच्या पत्नीचा केलेला पराभव विशेष ठरला आहे. ट

दरम्यान नंदुरबार जिल्हा परिषदेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेत तसेच अध्यक्ष , उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडणुकीत 7 जागा जिंकणारी शिवसेना आणि 3 जागांवर विजय मिळवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

ZP Election 2020 : नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांना धक्का, जि.प. निवडणुकीत पत्नी पराभूत

ZP Election 2020: पालघरमध्ये भाजपाची पडझड; शिवसेना नं. १, पण राष्ट्रवादी 'गेम चेंजर'

जिल्हा परिषद निवडणुक: गृहमंत्री देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख विजयीया निवडणूकीत जवळपास जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे वारसदार आपले भाग्य आजमावित होते.  त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक हे विजयी झाले आहेत.  माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अ‍ॅड. सिमा वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी हे विजयी झाले आहेत.  सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या देखील लोणखेडा गटातून विजयी झाल्या आहेत. अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यात आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी या तोरणमाळ ता. धडगाव गटातून पराभूत झाल्या आहेत. त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराने पराभूत केले आहे. तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे खांडबारा गटातून पराभूत झाले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ. भगवान पाटील हे देखील म्हसावद गटातून पराभूत झाले आहेत.

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाcongressकाँग्रेस