शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यात ५५० शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांचे केळी, पपई व उसाचे नुकसान ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील ५२३ शेतकऱ्यांचे केळी, पपई व उसाचे नुकसान झाले आहे. साधारण अर्ध्या कोटीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाने केले आहे. नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सोपविण्यात आला आहे. आता शेतकºयांना नुकसान भरपाईबाबत शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.गेल्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाºयासह वरूण राजाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकºयांची केळी, पपई, ऊस व आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यातही केळी व उसाच्या पिकास मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. बहुसंख्य शेतकºयांच्या केळीच्या बागाच उद्ध्वस्त केल्या होत्या. काही ठिकाणी उसाचेही अक्षरश: तुकडे-तुकडे केले होते. येथील कृषी व महसूल प्रशासनाने युद्ध पातळीवर पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली आहे.कृषी विभागाच्या माहितीनुसार तळोदा तालुक्यातील ५२३ शेतकºयांचे नुकसान झाले आहे. यात २८४ शेतकरी ऊस उत्पादक तर २२९ शेतकरी केळी उत्पादक आहेत. यात शेतकºयांचे पपई, आंबा, गवारचे नुकसानीचा समावेश आहे. तालुक्यात बोरद १००, धानोरा ९७, खरवड ६६, दसवड ६५, आमलाड ५०, मोड २७, तळवे २१, कढेल १५, मोरवड १६, नवागाव नऊ, काजीपूर आठ, खेडले, आष्टे प्रत्येकी सात, रामपूर, भवर, सलसाडी, चिनोदा प्रत्येकी सहा, गुंजाळी दोन, छोटा धनपूर, दलेलपूर, हलालपूर प्रत्येकी एक या प्रमाणे गावनिहाय शेतकºयांचे नुकसान झाले आहे. ४५ लाख १८ हजार रूपयांचे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. उसाने १३६.११ हेक्टर तर केळीचे १४६.७० हेक्टरचा पंचनामा करण्यात आला आहे. केळीचे २६ लाख ७२ हजार रूपये हेक्टरी तर उसाचे १८ लाख ४५ हजार रूपये दाखविण्यात आले आहे. केळीस १८ हजार रूपये हेक्टरी तर ऊस, पपईस १३ हजार रूपये प्रमाणे शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जात असल्याचा शासनाचा आदेश आहे. वादळी पावसात झालेल्या शेतकºयाच्या पिकाचे नुकसान कृषी व महसूल यंत्रणेच्या कर्मचाºयांनी युद्ध पाळीवर म्हणजे शनिवार, रविवार अशा सुट्टीच्या कालावधीतही पूर्ण केला आहे. तालुक्यात २८५.१६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. आता जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाई प्रकरणी पुढील कार्यवाही तत्काळ करावी. शिवाय लोकप्रतिनिधींनी त्यासाठी शासनाकडे ठोस प्रयत्न करण्याची गरज आहे. काण पालकमंत्र्यांबरोबरच जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष बांधावर येवून नुकसानीची पहाणी करत शेतकºयांना धीर दिला आहे. तसे गेल्यावर्षी झालेल्या पर्जन्यवृष्टी व अवकाळीने शेतकºयांचा संपूर्ण हंगामच वाया गेला होता. त्यातून सावरत जशा-तशा ऊस व केळीच्या बागा फुलविल्या होत्या. मात्र आसमानी संकटाने एक-दीड तासातच होत्याचे नव्हते केले. त्यामुळे बळीराजा अक्षरश: मेटाकुटीस आला आहे. त्याला तत्काळ आर्थिक मदत मिळाली तर पुन्हा तो उभा राहील. तथापि यासाठी लोकप्रतिनिधींनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याची अपेक्षा आहे.नुकत्याच झालेल्या वादळी पावसात नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील २८४ हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, उसाचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, तसा अहवाल प्रशासनाकडे पाठविण्यात येईल.-नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, कृषी कार्यालय, तळोदाअल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे बटाई शेतीस तीन एकर केळी लावली होती. त्यात महागडे रोप व रासायनिक खतांच्या दोन लाखांचा खर्च केला होता. मेहनतीने बागही चांगली फुलली होती. ऐन परिपक्वहोण्याच्या मार्गावर असतांना शुक्रवारच्या वादळी पावसाने पूर्ण भुईसपाट झाली. खर्चदेखील वाया गेला आहे. या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी शासनाने तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी. -कांतीलाल साळुंखे, शेतकरी, तळवे, ता.तळोदा