शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

लाॅकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. त्यात उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री वाढते, त्यामुळे लिंबूला मागणी असते. परिणामी, दरही चांगला मिळतो, म्हणून ...

लाॅकडाऊनमुळे सर्वच बाजारपेठा बंद आहेत. त्यात उन्हाळ्यात शीतपेयांची विक्री वाढते, त्यामुळे लिंबूला मागणी असते. परिणामी, दरही चांगला मिळतो, म्हणून अनेक शेतकरी लिंबूची लागवड करून उत्पादन घेतात. मात्र, मागील वर्षाप्रमाणे यंदाही लॉकडाऊनमुळे लिंबूला मागणी नसल्याने, अनेक शेतकऱ्यांनी तोडच केली नाही. हे लिंबू एप्रिल महिन्यातही झाडावरच राहिल्याने ते पिवळे होऊन जमिनीवर गळून खाली पडत आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात लिंबू विक्रीचा हंगाम असतो व चांगला भावही मिळतो, पण सलग दुसऱ्या वर्षीही लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने हा माल कसा व कोठे विकावा, ही समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

तोरखेडा परिसरात मोठ्या संख्येने लिंबूच्या बागा आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात लिंबूला किलोला ८० ते १०० रुपये प्रती किलो भाव मिळतो, पण कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे शासनाने लाॅकडाऊन घोषित केल्याने आठवडे बाजारसह रेस्टॉरंट, हॉटेल, रसवंत्या बंद आहेत. त्यामुळे लिंबूची मागणी घटली, तसेच बाजारपेठेत ग्राहकही कमी झाले आहेत. आता फक्त मे महिनाचे काही दिवस माल विक्रीसाठी उरले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामातही लिंबूला मागणी नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.

‘सी’ जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबाचा खाद्यपदार्थासह औषधांसाठी वापर होतो. कोरोनासह इतर अनेक आजार रोखण्यासाठी लिंबू आरोग्यवर्धक आहे. लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने, तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात लिंबू लागवडीसह व्यवसायाकडे वळल्याचे दिसत आहे. सध्या सर्वत्र बंदची अवस्था असल्याने लिंबाची मागणी घटली असून, लिंबाच्या घटत्या किमतीने उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

सद्यस्थितीत लिंबाच्या एका गोणीला ७०-८० रुपये असा दर मिळतो. हे लिंबू तोडण्यासाठी ४०-५० रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर, वाहतूक व बाजारपेठेतील इतर खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती काहीही येत नाही.

- महेश बिजलाल पाटील, लिंबू उत्पादक, फेस, ता.शहादा

मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत लिंबूला चांगली मागणी असते व भावही मिळतो, पण लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने मालाला उठावच नसल्याने तो कसा व कोठे विकावा, ही खरी समस्या शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.

- पतंगराव बाजीराव पाटील, लिंबू उत्पादक, तोरखेडा, ता.शहादा