शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या ‘सिलेज’ प्रकल्पाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू होणा:या आदिवासी अकादमीअंतर्गत शहर आणि खेडे यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सुरू होणा:या आदिवासी अकादमीअंतर्गत शहर आणि खेडे यांच्या सुविधांचे एकत्रिकरणाच्या अर्थात सिलेज प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ झाल्याची माहिती कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी नंदुरबारात दिली. या प्रकल्पासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने 13 कोटी 95 लाख 91 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे.  या प्रकल्पाच्या कार्यालयाचा शुभारंभ गुरुवारी कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांच्या हस्ते येथील पी.के.अण्णा पाटील विद्यालयाच्या आवारात झाला. त्याआधी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ.पाटील बोलत होते. यावेळी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ.अजित पाटणकर, प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ.एस.टी.बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक डॉ.ए.बी.चौधरी,  विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.दिलीप पाटील, काकासाहेब हिरालाल चौधरी शिक्षण संस्थेचे डॉ.रवींद्र चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, सिनेट सदस्य प्रा.डॉ. दिनेश खरात, जी.वाय.पाटील उपस्थित होते.  कुलगुरू डॉ.पाटील यांनी सांगितले, नंदुरबारात आधीच आदिवासी अकादमी मंजुर झाली आहे. यासाठी राज्य शासनाकडून 25 एकर जागा देखील उपलब्ध झालेली आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून निधीही मिळाला, परंतु त्याला काही अडचणी आल्या. आता विद्यापीठाच्या निधीतून आणि राज्य शासनाकडून मिळणा:या निधीतून येथे इमारत उभी राहणार आहे. डीपीडीसीचा निधीही त्यासाठी घेतला जाणार आहे. याच उपक्रमाअंतर्गत ‘सिलेज’ अर्थात सीटी लाईक व्हिलेज उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहादा, तळोदा, धडगाव व अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील 100 गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यात सौरउर्जा, शुद्ध पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन    तंत्रज्ञान, जैविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असणार आहे. याच अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापन केले जाणार आहे. याशिवाय तंत्रज्ञान प्रशिक्षण, कार्यशाळा, जनजागृती अभियान आणि क्षेत्र भेटी देखील असणार आहेत. याच अंतर्गत    सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत  पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा देखील प्रस्ताव असल्याचे         कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा.डॉ.विजय शर्मा, प्रा.डॉ ए.टी पाटील, प्रा.डॉ.टी.ए मोरे, डॉ.एस.व्ही देवरे, डॉ.गरुड, प्राचार्य डॉ.विनोद श्रीवास्तव, प्राचार्य डॉ.डी.एस पाटील, प्रा.डॉ. सुनील कुवर, प्रा.डॉ.नरेंद्र गोसावी, मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.  

4विद्यापीठाच्या आदिवासी अकादमीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या 25 एकर जागेवर लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे. बांधकाम आणि इतर कामांसाठी 24 कोटी रुपयांचा प्रस्ताव आहे. पैकी 15 कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्हा नियोजन आणि विकास समितीकडूनही निधी उपलब्ध होणार आहे.सिलेज प्रकल्पात बायफ संस्था, कृषी विज्ञान केंद्र, एमकेसीएल व बीआरसी यांचाही सहभाग आणि सहकार्य राहणार आहे.या प्रकल्पासाठी सुरुवातीला 40 पदे मंजुर झाली आहेत. लवकरच जाहिरात काढून ही पदे भरली जाणार आहेत. हा प्रकल्प ठराविक काळापुरता न राहता निरंतर चालणारा आहे. नवउद्योजक घडविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत  उद्योजक संसाधन केंद्र अर्थात स्ट्रेनची स्थापना नंदुरबारात केली जाणार आहे.