जमीन आरोग्य पत्रिकेपासून नंदुरबारातील निम्मे गावे वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:54 AM2018-09-06T11:54:25+5:302018-09-06T11:54:32+5:30

मृदा तपासणी : शेतक:यांना मार्गदर्शनाचा अभाव, स्वतंत्र विभाग होऊनही दुर्लक्ष

From the land health magazine, half the villages of Nandurbar | जमीन आरोग्य पत्रिकेपासून नंदुरबारातील निम्मे गावे वंचीत

जमीन आरोग्य पत्रिकेपासून नंदुरबारातील निम्मे गावे वंचीत

Next

नंदुरबार :जिल्ह्यातील मृद, जलसंधारणाची परिस्थिती पहाता अद्यापही निम्मे गावांमधील जमिनीची आरोग्य पत्रिका तयार करण्यात आलेल्या नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षात 349 गावांमधील 23 हजार 498 शेतक:यांना मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या.  यावर्षी 23 हजार 302 मृद आरोग्य पत्रिकांचे लक्षांक ठेवण्यात आले आहे.
शेतक:यांना जमिनीनुसार पिकांचे नियोजन करण्यासाठी जमिनीच्या आरोग्य पत्रिकेला अर्थात मृद तपासणीला विशेष महत्त्व आले    आहे. शासन पातळीवर ते गांभिर्याने घेतले गेले आहे. शासनाने गेल्या वर्षापासून मृद व   जलसंधारण     खातेच नव्याने अस्तित्वात आणले आहे. अशा या महत्वाच्या मृद तपासणी अभियानाबाबत मात्र जिल्ह्यात फारसे गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे.
तीन वर्षापासून मोहिम
राज्यात 2014-15 पासून याबाबत अभियान राबविण्यात येत आहे. जमिन आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत प्रत्येक क्षेत्राचे माती परिक्षण करून घेणे आणि जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेवून खतांचे प्रमाण निश्चित करणे व त्यांचा वापर करणे    हा उद्देश आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील गावांची टप्प्याटप्प्याने निवड करून  सर्व शेतक:यांना आगामी दोन वर्षात जमिन आरोग्य पत्रिकेच्या     माध्यमातून मृदा साक्षर करण्यात येणार आहे. 
जमिनीचा रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्ये कमरता स्थितीची माहिती याद्वारे शेतक:यांना देण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरीता केंद्र शासनाचा 60 व राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहभाग आहे.
लक्षांक मोठा, कामे मात्र नाही
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील 349   गावातील 21 हजार 183 मृदा तपासणीचे लक्षांक ठेवण्यात आले होते. पैकी 19 हजार 64  मृद नमुने तपासणी करण्यात आली होते. त्यातून 23 हजार 498 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण शेतक:यांना करण्यात आले आहे. 2018-19 मध्ये जिल्ह्यातील 586 गावातील 23 हजार 302 मृद नमुने तपासणी करून जमिन आरोग्य पत्रिकेचे वितरण करणे बाबतचे नियोजन करण्यात आले आहे. 
योजनेचा उद्देश
रासायनिक खतांचा अर्निबध वापर कमी करून मृत तपासणीवर आधारीत अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलीत व परिणामकारक वापरास प्रोत्साहन याद्वारे देण्यात येणार आहे. मृत आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते, सेंद्रीय खते, गांढुळखत, निंबोळी/सल्फर आच्छादीत युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणा:या खतांचा वापरास     प्रोत्साहन देण्यात येत आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या उत्पादकतेत देखील वाढ करण्यात येत आहे.
 क्षमता वृद्धी करून कृषी शाखेच्या विद्याथ्र्याचा सहभाग वाढविण्यात आला आहे. भारतीय कृषी संशोधन अनुसंधान, कृषी विद्यापीठातील मृद तपासणी प्रयोगशाळांच्या कार्यपद्धतीत याद्वारे   सुधारणा घडवून आणण्यात येत आहे. जमिनीच्या उत्पादकतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यांमध्ये मृद नमुने काढण्याच्या व तपासणीच्या पद्धतीमध्ये समानता आणली जावून निर्धारीत जिल्ह्यांमध्ये तालुका, परिमंडळस्तरीय खतांच्या शिफारशी विकसीत करण्याचे नियोजन याद्वारे करण्यात येत आहे.
जमीन आरोग्य पत्रिकेनुसार शेतक:यांनी पीकांचे नियोजन केल्यास शेतक:यांना त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे सर्वानीच मृदा तपासणीसाठी आग्रह धरणे आवश्यक आहे. शहादा तालुक्यात सर्वाधिक जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात  आल्या आहेत. त्यात 71 गावातील पाच हजार 395 शेतक:यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आली. नंदुरबार तालुक्यात 68 गावांमधील तीन हजार  878 शेतक:यांना, नवापूर तालुक्यातील 57 गावांमधील तीन हजार 733 शेतक:यांना, तळोदा तालुक्यातील नऊ गावांमधील एक हजार 978, अक्कलकुवा तालुक्यातील 87 गावातील तीन हजार 906 तर धडगाव तालुक्यातील 57 गावातील चार हजार 608 शेतक:यांना जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आली आहे. याशिवाय 2015-16 मध्ये  17 हजार 587 मृदा तपासणी करण्यात आली तर 2016-17 मध्ये 23 हजार 688 मृदा नमुने तपासणी करण्यात आली. दोन्ही वर्षी अनुक्रमे 99.9 व 92.63 टक्के लक्ष साध्य करण्यात आल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पहाता प्रत्येक तालुक्यात जमिनीचा प्रकार वेगवेगळा आहे. जमीन मृदा तपासणीत मुख्यत: मातीचा सामु, क्षारता, कर्ब, उपलब्ध स्फूरद, पालाश, नत्र, गंधक, बोरॉन व सुक्ष्म मुलद्रव्य अर्थात जस्त, लोह, तांबे, मंगल आदी घटकांची तपासणी करण्यात येते.
धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश शेतजमिन ही उतारावरची आहे. शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यातील जमिन काळी व भुसभुसीत आहे. तर नवापूर तालुक्यातील अनेक भाग हा दलदल स्वरूपाचा अर्थात भात पिकासाठी चांगला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जमिनीची आरोग्य तपासणी करून शेतक:यांना त्यानुसार पिक नियोजन करणे, खतांचा उपयोग, पाणी देणे यासह इतर बाबींचे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. 
 

Web Title: From the land health magazine, half the villages of Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.