शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.बस सेवेअभावी ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:16 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन तिसरा आठवडा उजाडला तरी अद्याप ग्रामिण भागातील ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन तिसरा आठवडा उजाडला तरी अद्याप ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी.बस सेवा व त्यासाठीची पास सेवा सुरू न झाल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने बससेवा व पास सेवा सुरू करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. परंतु आता उपस्थितीत वाढ झाली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाची भिती हळूहळू कमी होऊ लागली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. असे असले तरी केवळ शहरी भागातील विद्यार्थीच शाळांमध्ये हजर राहत आहेत. ग्रामिण भागातून ये-जा करणारे विद्यार्थी अद्यापही शाळांपासून वंचीत आहेत. त्याला कारण ग्रामिण भागात सार्वजिनक प्रवासी वाहतुकीची वाहने नसल्याचे दिसून येत आहे. एस.टी.महामंडळाने ग्रामिण भागातील बस फेरऱ्यांमध्ये अद्यापही वाढ केलेली नाही. ज्या गावात बसेस जातात तेथील विद्यार्थ्यांना मात्र दररोज भाडे खर्चून यावे लागते. त्याला कारण विद्यार्थी बस पास दिल्या गेल्या नसल्याचे समोर येत    आहे. याबाबत अनेक शाळांनी एस.टी.आगाराकडे पास उपलब्ध करून द्याव्या व काही भागात एस.टी.च्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी केली आहे. परंतु त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. दररोज भाडे खर्च करून परवडणारे नसल्याने पालक देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवीत नसल्याचे चित्र आहे. सर्वाधिक नुकसान विद्यार्थीनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शहरात येतात किंवा गावी जाऊ शकत आहेत. विद्यार्थींनीना मात्र अनेक मर्याद येत असल्याने आणि पालकही धजावत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. सामान्य एस.टी.च्या फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या विद्यार्थींनींसाठीच्या बसेस देखील बंद आहेत. त्या देखील तातडीने सुरू करणे आवश्यक आहे. या सर्व प्रकारामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधीक शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा लवकरात लवकर अभ्यासक्रम संपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर सराव परीक्षांना सुरूवात करणार आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू केल्याने शाळांनी ॲानलाईन क्लास देखील बंद केला आहे. त्यामुळे शाळेत न येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.