शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

कुसुमवाडा आरोग्य केंद्रच ‘व्हेंटीलेटर’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 4:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व चांगली आरोग्य सेवा ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : शहादा तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी व चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी १९८३ मध्ये कुसुमवाडा, ता.शहादा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. सद्यस्थिती या आरोग्य केंद्रातील सोयीसुविधांचे तीनतेरा झाले असून जीर्ण इमारत, रिक्त पदे, लोकसंख्येचा विचार न करता अपुरी व्यवस्था, कर्मचाऱ्यांसाठी असलेली गळकी व नादुरुस्त निवासस्थाने, अपूर्ण कर्मचारी आदी समस्यांनी हे प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रासले आहे.कुसुमवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामपातळीवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी फत्तेपूर, आमोदा, कन्साई, कुसुमवाडा, कुढावद, रामपूर या दुर्गम भागात उपकेंद्र सुरू करण्यात आली आहते. याठिकाणी निवास्थाने काही प्रमाणात चांगली असली तरी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील कर्मचारी निवासस्थाने जीर्ण झाले असून पूर्णत गळती लागली आहे. छत कोसळलेल्या स्थितीत असल्याने निवासी कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.निवासस्थानांचे बांधकाम निकृष्टप्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील जुने कर्मचारी निवासस्थान तोडून गेल्या तीन ते चार वर्षापूर्वी नव्याने कर्मचारी निवासस्थान बांधण्यात आले होते. परंतु या निवासस्थानांना गळती लागली असून मध्ये बसवलेल्या फरशी जमिनीत जात असल्याने कर्मचारी भाड्याने घरे घेऊन राहत आहेत. शौचालयांचीही दूरवस्था झाली असून दरवाजे-खिडकी तुटल्याने कर्मचाºयांना पाल, कापड बांधून त्याचा वापर करावा लागत असल्याचे दिसून आले आहे.इमारत नव्याने बांधण्याची मागणी१९८२-८३ वर्षी बांधकाम झालेली प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्थाच व्हेंटिलेटरवर आली असून ही इमारत कधीही कोसळून मोठी दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या इमारतीला गळती लागली असून याठिकाणी जुन्या इमारतीवर स्लॅब टाकण्यात येत आहे. परंतु इमारत ४० वर्षे जुनी असून इमारतीवर जास्त वजन झाल्याने ही इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कुसुमवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन, आरोग्य सेवक, परिचारिका यांच्या सात जागांपैकी चार जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर शिपाई, क्लर्क, स्लीपर आदी पदे रिक्त असल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या महामारीत आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून स्थानिक पातळीवर रुग्णांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.