यावेळी प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांनी घरोघरी जाऊन लसीकरणासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. परिणामी १८० जणांनी लस टोचून घेतली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}आदिवासी समाजात अद्यापही लसीकरणाबाबत विविध अफवा आणि गैरसमज पसरलेले आहेत. गैरसमजातून कोविड लसीकरणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिवासी समाजापुढे वडसत्रा येथील आदिवासी बांधवांनी एक आदर्श निर्माण केला आहे.
लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गताडीचे आरोग्य कर्मचारी, वडसत्रा येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सखूबाई गावित व प्राथमिक शाळा शिक्षक वृंद तसेच माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील व शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व गावातील तरुण नारायण गावित, अमेश गावित यांनी पूर्ण वेळ थांबून नियोजन केले.