सातपुड्यातील डोंगरी शेतीत खरीपाची पेरणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:17 PM2020-06-28T12:17:15+5:302020-06-28T12:18:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : सातपुड्याच्या पर्वत रांगात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरण्या व मशागतीच्या कामांना वेग ...

Kharif sowing begins in the hill farms of Satpuda | सातपुड्यातील डोंगरी शेतीत खरीपाची पेरणी सुरू

सातपुड्यातील डोंगरी शेतीत खरीपाची पेरणी सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : सातपुड्याच्या पर्वत रांगात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरण्या व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. सातपुड्यातील आदिवासी बांधव आपल्या शेत शिवारातील कामात व्यस्त असल्याचे पाहायला दिसून येत आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून दुपारच्या सुमारास सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव तालुक्यातील चांदसैली, माळ, पिंपळबारी, उखळीआबा यांच्यासह सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या तळोदा तालुक्यातील कोठार, वरपाडा, अंबागव्हाण इत्यादी परिसरात गेल्या तीन दिवसापासून दुपारच्या सत्रात कुठे दमदार तर कुठे तुरळक प्रमाणात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. या पावसाच्या हजेरीमुळे सातपुड्यातील शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामाला वेग आला आहे.
खरीप हंगामात सातपुड्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ज्वारी, मका, तूर या सारख्या पिकांची लागवड करीत असतात. काही शेतकरी कापसाचीदेखील लागवड करणे पसंत करतात. पावसाच्या हजेरीमुळे जमिनीत पेरणी योग्य ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे तर पहिल्या पावसानंतर लगेच पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडून तसेच पेरणीची तयारीत असणाºया शेतकºयांनी मशागतीच्या कामांना वेग दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव असून, शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. अश्या परिस्थितीत कुटुंबातील लहान मोठे सर्व जण शेतात काम करतानाचे चित्र सातपुड्यात पाहायला मिळत आहे. कुटुंबातील लहान मुलेदेखील शेतात मदत करताना दिसून येत आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव मात्र पारंपरिक पद्धतीने पेरणी व मशागतीचे कामे करणे पसंद करतात. पारंपरिक शेतीची औजारे वापरून पेरणी व मशागत करतानाचे दुर्मिळ चित्र सद्या सातपुड्यात पाहायला मिळत आहे.

सातपुडा पर्वत रांगेत दरवर्षी पहिल्या पावसानंतर मोठ्या प्रमाणात हिरवळ पसरते. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यापासून घरात थांबून असलेल्या नागरिकाना सातपुड्यातील हिरवळ आकर्षिक करू लागली आहे. गेल्या आठवड्यात दोन ते तीनदा पावसाने हजेरी लावल्याने सातपुड्यात सर्वत्र हिरवळ दिसायला सुरूवात झाली आहे. त्यातच दुपारच्या सत्रात बरसणाºया पावसाच्या सरी गारवा निर्माण करीत असल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे उत्साही तरूणांची पावले पर्यटनासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगांकडे वळू लागली आहे.

Web Title: Kharif sowing begins in the hill farms of Satpuda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.