शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

आसाणे ग्राम पंचायतीत 40 लाखांची रोजगार निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 13:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  रोजगार हमी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टर २० आंब्यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  रोजगार हमी योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोठी लाभदायक ठरत आहे. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टर २० आंब्यांच्या लागवडीसाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून नंदुरबार तालुक्यातील आसाणे येथे ४० लाख रुपयांची रोजगार निर्मिती ग्रामपंचायतीने केली आहे. तालुक्यातील आसाणे येथील  सरपंच चंद्रकांत पाटील यांनी रोजगार हमी योजनेतून ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला व कृषी विभागामार्फत बांधावर फळबाग लागवडीसाठी सागर पाटील यांना प्रस्ताव तयार करण्यास सांगितला. यासाठी लागणारे              इस्टिमेंट कृषी सहायक बादल बंजारा यांनी केले.  यावेळी गावातून ११४ प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात लक्ष घालून तालुका कृषी अधिकारी रामू पवार यांना तांत्रिक मंजुरी देण्याचे आदेश दिले. प्रशासकीय मान्यता उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली. शेतकऱ्यांना बांधावर हेक्टरी २० आंब्यांची लागवड करण्यासाठी अंदाजे ३२ हजार रुपये मंजुरी मिळाली आहे. यातून आसाणे गावात तब्बल ४० लाख रुपयांची रोजगार निर्मिती ग्रामपंचायत करू शकली आहे.

गांडुळ युनिटसाठी शेतकऱ्यांना निधी मंजूरप्रथम वर्षाला शेतकऱ्यांना अंदाजे १८ हजार रूपये मिळतील. वर्षाला सात हजार रूपये व तिसऱ्या वर्षाला सात हजार रूपये मिळतील. फळबाग लागवडीसाठी मंडळाधिकारी पी.एच. धनगर व एम.जी. धोत्रेे यांनी शेतकऱ्यांना लागवडीसाठी व झाडांचे संगाेपन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात. मागील वर्षी राेजगार हमी योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला गांडूळ युनिटसाठी प्रत्येकी १० हजार रूपये मंजूर करून दिले होते. त्यातून गावात आठ लाख रूपयांचा रोजगार निर्माण करण्यात आला होता. या गांडूळखता शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होत आहे. भविष्यात जास्तीचे खत तयार करून शेतकरी गटामार्फत पॅकिंग करून बाजारात विकण्यासाठी ग्रामपंचायत योजना करीत आहे.

भविष्यात प्रत्येक योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. शेतकऱ्यांना शेती जोडव्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काम करणार आहे.    -चंद्रकांत पाटील, सरपंच, आसाणे