शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

कायदा हातात घेतल्यास गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात शहर शांतता समिती सदस्यांची बैठक शहादा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या आवारात शहर शांतता समिती सदस्यांची बैठक शहादा प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. येत्या आठवडय़ात श्रीराम जन्मभूमीचा निकाल तसेच दोन दिवसापूर्वी ईद-ए-मिलाद या दोन मोठय़ा घडामोडींमुळे शहर व परिसराची कायदा आणि सुव्यवस्था, शांतता अबाधित राहावी याकरिता बैठक घेण्यात आली.या वेळी शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, शहादा नगरपालिकेचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतिलाल टाटिया,  जामा मशिदीचे मौलाना कादरी  आदी मान्यवर  उपस्थित होते.याप्रसंगी शहादा प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी म्हटले की, येणा:या आठवडय़ात श्री राम जन्मभूमी-बाबरी मशीद यांचा निकाल जाहीर होणार असून, निर्णय कुठल्याही बाजूने लागो निर्णयाच्या विरोधात कोणताही व्यक्ती जाणार नाही, असे आव्हान करीत प्रशासन या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. शहर परिसर आपलं आहे. शांततेला गालबोट लागू नये याकरिता शांतता समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकत्र्यानी याची दक्षता घ्यावी. तसेच 10 नोव्हेंबर रोजी मुस्लीम बांधवांचा ईद-ए-मिलाद उत्सव साजरा होणार आहे.  हा सण  मुस्लिम बांधवांनी उत्साहाने व शांततेत साजरा करण्याचेदेखील आव्हान करण्यात आले आहे.  उपविभागीय पोलीस अधिकारी सपकाळे यांनी सोशल मीडियावर चुकीचे संदेश पाठवून ते त्वरित फॉरवर्ड करू नये.  सध्या सर्वच भ्रमणध्वनी हे सायबर सेलच्या अंतर्गत आलेले असून, चुकीचा मेसेज फॉरवर्ड करणा:यां विरूद्ध पोलीस प्रशासनाकडून कडक  कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.बैठकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची ग्वाही शांतता समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष अशोक बागुल,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, डॉ.पाटिया, प्रा.लियाकत अली सय्यद नूह नूरानी, नगरसेवक वसीम तेली, माजी नगरसेवक के.डी. पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, इरफान पठाण, समीर जैन, नगरसेवक संजय साठे, आरिफ पिंजारी, संदीप पाटील, नंदुरबार जिल्हा शिवसेना माजी प्रमुख अरुण चौधरी, भाजपाचे दिनेश खंडेलवाल, माजी नगरसेवक सुपडू खेडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सरसंघचालक डॉ.हेमंत सोनी, ललित छाजेड, प्राचार्य खलील शहा यांच्यासह शहरातील हिंदू-मुस्लीम समाजातील शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील तर आभार तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले.