शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीतून गुंतवणूक वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बऱ्यापैकी उलाढाल सुरू आहे.लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांना आर्थिकबाबीला सामोरे जावे लागत आहे. यातून सराफा व्यावसाय देखील सुटला नाही. तब्बल दोन महिने बंद राहिलेला हा व्यवसाय लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. हळूहळू या व्यवसायाची गाडी रुळावर आली आहे. खरेदीसाठी देखील गर्दी होऊ लागली आहे. भाव लॉकडाऊनच्या आधीपेक्षा आता १० ते २० टक्के वाढला आहे. त्याचाही काही परिणाम व्यवसायावर दिसून येत नसल्याची स्थिती आहे.गुंतवणुकीकडे कललग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बºयापैकी उलाढाल सुरू आहे.येत्या दीड ते दोन महिन्यात उलाढाल कायम राहणार असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणने आहे. लॉकडाऊननंतर सराफा बाजारात गर्दी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजार सुरू राहत आहे. सध्या सोने खरेदीतून त्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचे नंदुरबार जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दिनानाथ श्रॉफ यांनी सांगितले.कारागिरांना मदतलॉकडाऊनमुळे दोन महिने सराफा बाजार बंदच होता. व्यवहार ठप्प होते, त्यामुळे अनेक लहान व्यावसायिकांची आणि कारागिरांची उपासमार झाली. यासाठी मात्र सराफा असोसिएशन धावून गेले. त्यांना दोन महिने मदत देत त्यांना सावरले गेले. नंदुरबार जिल्ह्यात दागीने घडविणारे बंगाली कारागिर मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतू हे कारागिर परत आपल्या गावी गेले नाही. येथेच राहिले. असोसिएशनने त्यांना आधार दिला. त्यामुळे दागीने घडविण्यासाठी सद्य स्थितीत कुठलीही अडचण नसल्याचे असोसिएशनचे म्हणने आहे.चांदी उलाढालीवर परिणामजिल्ह्यातील आदिवासी चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. होळीच्या काळात तसेच परराज्यातून मजुरी करून परत आल्यावर चांदी खरेदीकडे या कुटूंबांचा कल असतो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे या खरेदीवर पाणी फिरले गेले. सलग दोन महिने व्यवसाय बंद असल्यामुळे चांदी विक्रीत मोठी तूट झाली. आता खरीप हंगामानंतरच चांदी खरेदीकडे कल राहील असा अंदाज आहे.सोन्याच्या भावात लॉकडाऊनंतर १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी खरेदीमध्ये मात्र कुठलाही परिणाम झालेला नाही. जुलै अखेरपर्यंत सराफा बाजारात तेजी कायम राहणार आहे.लॉकडाऊनंतर सराफा व्यवसाय आता रुळावर आला आहे. सोन्यातील गुंतवणूक आता वाढीस लागली आहे. लग्न समारंभांवर आलेली खर्च मर्यादामुळे तो पैसा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे आता लोकांचा कल वाढला असल्याचे चित्र आहे.-मनोज श्रॉफ, अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन, नंदुरबार.