शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा : डॉ.राजेंद्र भारुड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:31 IST

बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर, चेतन गिरासे, शाहूराज मोरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, ...

बैठकीस अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, उपविभागीय अधिकारी महेश सुधाळकर, चेतन गिरासे, शाहूराज मोरे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

डॉ.भारुड म्हणाले, धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रत्येकी ५ पथके स्थापन करावे. प्रत्येक पथकामार्फत किमान १०० स्वॅब नमुने संकलित करण्यात यावे. संकलित केलेले सर्व स्वॅब त्याच दिवशी जिल्हा रुग्णालयात पाठवावे. धडगाव तालुक्यात अलगीकरण कक्षासाठी आदिवासी वसतीगृहात व्यवस्था वाढवावी. येथील ग्रामीण रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवावी. तालुक्यात एकही बाधित व्यक्ती घरी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी असल्यास जिल्हा रुग्णालयाकडे संदर्भित करावे.

जिल्ह्यात कोरोना परिस्थिती आणि सार्वजनिक वितरण प्रणाली या दोन कामांवर अधिक लक्ष केंद्रीत करावे. सुरू असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी. मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांविरोधात कारवाई करावी. कोरोना संकटाची तीव्रता कमी होईपर्यंत तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित रहावे. नवापूर आणि धडगाव तालुक्यात लसीकरणाला गती देण्यात यावी. लसीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींची नोंदणी येत्या १५ दिवसांत युद्धपातळीवर पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

गावडे म्हणाले, लसीकरणासाठी पात्र व्यक्तींची नोंदणी करण्यात यावी आणि मोहीम स्तरावर लसीकरण करण्यात यावे. शिक्षण विभागाच्या सहाय्याने नोंदणीचे कामाला गती देण्यात येईल. नोंदणीच्या कामांचा दैनंदिन स्तरावर आढावा घेण्यात येईल.

कोरोना चाचणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत सर्व स्वॅब प्रयोगशाळेत पोहोचतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, शहादा येथील समर्पित कोविड उपचार केंद्र, नगरपालिकेकडील शववाहिका, नवापूर ट्रामा केअर सेंटर इमारतीतील ऑक्सिजन खाटांची व्यवस्था, तळोदा आणि अक्कलकुवा येथील ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविणे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस तहसीलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.