नवापुरात अपघातग्रस्त ट्रकमधून ५२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:53 PM2020-06-03T12:53:45+5:302020-06-03T12:54:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरातील नाल्यात उलटलेल्या ट्रकमधील त्या अवैध दारुची किंमत तब्बल ५२ लाख रुपये निघाली. मंगळवारी ...

Illegal stock of liquor worth Rs 52 lakh seized from truck involved in accident in Navapur | नवापुरात अपघातग्रस्त ट्रकमधून ५२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नवापुरात अपघातग्रस्त ट्रकमधून ५२ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरातील नाल्यात उलटलेल्या ट्रकमधील त्या अवैध दारुची किंमत तब्बल ५२ लाख रुपये निघाली. मंगळवारी झालेल्या मोजदादीनंतर अवाक् करणारा हा आकडा बाहेर आला. ट्रकची किंमत मिळून नवापूर पोलिसांनी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
पोलीस सूत्रानुसार, १ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण हे गावात गस्त करीत असताना नयी होन्डा भागाकडे मालट्रक (क्रमांक जीजे-१८ - ९७९०) दिसून आला. त्यांना पाहून चालकाने सरळ सुरत रोडने न जाता शहरात गाडी वळविली. त्यामुळे उपनिरीक्षक नासीर पठाण यांना त्या वाहनाचा संशय आल्याने त्यांनी वाहनाला थांबण्याचा इशारा केला असता मालट्रकवरील चालक हा न थांबता शहराच्या दिशेने निघून आला. ही बाब उपनिरीक्षक नासीर पठाण यांनी पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना सांगितल्याने त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, धिरज महाजन व सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुजरात राज्याकडे जाणाºया नारायणपूर रोडवर त्या ट्रकचा शोध घेण्यासाठी रवाना केले. मालट्रकवरील चालकाने पोलिसांना समोरुन येताना पाहिल्यावर ट्रक लपविण्याचा प्रयत्न केला व ट्रक पसार होऊ शकणार नाही अशा रस्त्यावर ट्रक नेला. त्याच प्रयत्नात ट्रक नाल्यात उलटला व चालक वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी ट्रकची तपासणी करता त्यात विदेशी दारुचा ५२ लाख ६० हजार ८०० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा आढळून आला. १० लाख रुपये किंमतीचा मालट्रक व दारुसाठा असा एकूण ६२ लाख ६० हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पोलीस ठाण्यात आणून दारुबंदी सदराखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन, दिगंबर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक नासीर पठाण यांच्यासह हे.कॉ.विकास पाटील, प्रवीण मोरे, महेश पवार, अल्ताफ शेख, आदिनाथ गोसावी, पंकज सूर्यवंशी व निशांत गिते या कर्मचाऱ्यांनी केली.

Web Title: Illegal stock of liquor worth Rs 52 lakh seized from truck involved in accident in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.