शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

वावडीफाटय़ाजवळ अवैध दारूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी पिंपळनेर   रस्त्यावर गुजरातकडे विना परवाना देशी-विदेशी दारु वाहून नेणारी  ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांनी पिंपळनेर   रस्त्यावर गुजरातकडे विना परवाना देशी-विदेशी दारु वाहून नेणारी  कार व मुद्देमाल जप्त करुन सुबीर येथील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.पोलीस सूत्रानुसार, एका चारचाकी वाहनातून पिंपळनेरकडील जाणा:या रस्त्यावरुन  गुजराथकडे अवैधरित्या विदेशी दारुची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नवापूरचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक  डी.एस. शिंपी, सहायक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार, हे.कॉ. गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे यांनी नवापूर ते पिंपळनेर रस्त्यावर वावडी फाटा येथे सापळा लावून संशयीत वाहनास (क्रमांक जीजी- 19 ए-2161) इशारा करुन थांबवले. वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यात विनापरवाना दारु असल्याच्या माहितीची खात्री  झाली.  वाहनास पोलीस ठाण्यात आणून पंचांसमक्ष वाहनातून मुद्देमाल खाली उतरवून मोजणी केली असता विदेशी दारू, बियरच्या बाटल्या व  देशी दारुच्या प्लास्टीकच्या व काचेच्या बाटल्या अशी 50 हजार 184 रुपये किमतीचा देशी-विदेशी दारुसाठा आढळून आला.  वाहनाची किंमत 30 हजार मिळून एकूण 80  हजार 184 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  याप्रकरणी संशयित आरोपी  मनश्या बैजू महात्रे (36, रा.दहेल, ता.सुबीर, जि.डांग) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नवापूर पोलीस नेहमी सतर्क राहत असल्याने यापूर्वीही लोकसभा निवडणुकीच्या काळात अवैध दारुची मोठी कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांच्या कार्यकाळात अशा अनेक कारवाई करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली   पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डी.एस. शिंपी, कृष्णा पवार, गुमानसिंग पाडवी, प्रविण मोरे यांनी ही कारवाई केली असून याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास कृष्णा पवार करीत आहेत.