शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शुटींग पहायला गेलो अन् हिरो बनून आलो.. रेल्वेचे टी.टी.शिवाजी रामजी बैनवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:45 IST

रमाकांत पाटील।  लोकमत न्यूज नेटवर्क चित्रपट आणि टिव्ही सिरीअल मधील कलाकारांबाबत खूप उत्सूकता होती. ते कसे राहत असतील, कसे ...

रमाकांत पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कचित्रपट आणि टिव्ही सिरीअल मधील कलाकारांबाबत खूप उत्सूकता होती. ते कसे राहत असतील, कसे बोलतात, शुटींग कशी होते अशा अनेक बाबींचे आकर्षण वाटत होते. पण नशिबाने याच क्षेत्रातील एक मित्र मिळाला आणि त्याने ही सर्व उत्सूकताच पुर्ण केली. शुटींग पहाण्याची इच्छा त्याच्याजवळ व्यक्त केली तेंव्हा त्याने ते पहाण्याचे निमंत्रण दिले सोबत सिरिअल मधील एक रोलही माङयाकडून करून घेतला. त्यामुळे शुटींग पहायला गेलो आणि हिरोच बनून आलो.. प्रश्न : आजवर आपण कुठल्या सिरिअलमध्ये रोल केले आहेत? उत्तर : मी रेल्वेत नोकरी करतो. त्यामुळे नोकरी हे माङो पहिले प्राधान्य आहे. कलाकार आणि चित्रपटाबाबत माझा छंद आहे. हा छंद नोकरी सांभाळून जपावा लागतो. चित्रपट क्षेत्रातील एका मित्रामुळे मला माझा छंद जोपासण्याची संधी मिळाली आणि काही मोजक्या सिरीअलमध्ये काम करता आले. विशेषत: राशीविला व सावधान प्यार मे या दोन सिरिअलमध्ये काही भागात मी काम केले आहे. प्रश्न : सिरीअलमध्ये कामाचा पहिला अनुभव कसा राहिला आणि त्यात संधी कशी मिळाली?उत्तर : सुरुवातीला मला चित्रपटातील कलाकारांबाबत खूप आकर्षण होते. जेंव्हाही चित्रपट अथवा टिव्ही पहायचो तेंव्हा वाटायचे ही शुटींग कशी होत असेल. कलाकार कसे राहत असतील. त्यांचे बोलणे, वागणे याबाबत उत्सूकता वाटत होती. त्यामुळे एकदा तरी आपण शुटींग पहावी अशी इच्छा होती. ही इच्छा आपण आपल्या कुटूंबियांशीही बोलून दाखविली होती. एकदिवशी असाच कामानिमित्ताने पूर्वी रेल्वेशीच संबधीत असलेल्या लवसिंग ठाकूर या मित्राशी भेट झाली. ते चित्रपट आणि सिरिअलमध्ये कथा लेखनाचे काम करतात. त्यांच्याकडून त्याबाबत ऐकल्यानंतर त्यांच्याजवळच आपण शुटींग कसे होते ते पहायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आणि स्वप्न वास्तव्यात आले. शुटींग पाहण्याऐवजी रोलच करायला मिळाला.एका मेसेजने झाले स्वप्न पुर्णलवसिंग ठाकूर या कथा लेखकाचा एका रात्री मेसेज आला. उद्या शुटींग पहायला ये. आपण कुटूंबासह गेलो आणि तेथे त्याने चक्क सिरिअलमध्येच रोल करायला सांगितले. राशिविला या सिरिअलमध्ये कंपांऊडरचा रोल त्यांनी दिला. तेंव्हा सर्व अद्भूत वाटत होते. आणि हे काम आपल्याला करता येईल का? याची भितीही होती पण ते सर्व दूर झाले. आणि आपल्यातला सुप्त कलाकार जिवंत झाला.कलाकारांशी मैत्रीआधी ज्यांच्याबद्दल खूप आकर्षण होते त्यातील अनेकजण मित्र झाले. सुटीच्या दिवशी आपण या मित्र परिवारात जात असतो. तारक मेहता, भाभीजी घर पे है या सारख्या सिरिअलमधील सर्व कलाकार ओळखीचे आहेत. अलीखॉ यांच्या माध्यमातून अमिताभ बच्चनसह अनेक बडय़ा कलाकारांच्या सहवासही मिळाला. आपल्या बरोबरच मुलगा महेश यालाही कामाची संधी मिळाली.