शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि लॉज सुरू होणार पण अटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस व गेस्ट हॉऊस सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील हॉटेल्स, लॉजेस व गेस्ट हॉऊस सुरु करण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिली आहे़ आठ जुलै पासून एकूण क्षमतेच्या ३३ टक्के प्रमाणात दिलेल्या अटींवर ही प्रतिष्ठाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे़लॉजेस व हॉटेल्स सुरू होत असताना जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल बंद राहतील़ जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात घेतलेले हॉटेल, लॉजेस, गेस्ट हाऊस आदी मात्र जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. बुधवारपासून सुरू होणाऱ्या हॉटेल्स, लॉजेस आणि गेस्ट हाऊससाठी विविध दिशा निर्देश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत़ यात कोरोना प्रतिबंधात्मक उपायांवर फलक, आॅडिओ व व्हिडिओ क्लीप लावणे तसेच सूचनांची माहिती देणारे फलक लावण्याचे सूचित करण्यात आले आहे़ हॉटेल व बाह्य जागेत व पार्किंगच्या ठिकाणी गर्दीचे योग्य व्यवस्थापन, सोशल डिस्टन्सिंग, प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंग, रिसेप्शन टेबल व जागेत संरक्षक काचेची व्यवस्था, येणाऱ्यांसाठी हँड सॅनेटायझर आदीची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले आहे़याठिकाणी काम करणाºया कामगार, कर्मचाºयांसाठी तसेच येणाºया ग्राहकांसाठी संरक्षक साधनांसह फेस कव्हर, हँड ग्लोव्हज, मास्क यांचा पुरवठा करण्याचे आदेश असून कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आॅनलाईन पेमेंट, सोशल डिस्टसिंगसाठी लिफ्टचा वापर करणे, सूचनेनुसार एसी व व्हेन्टीलेशन वापरण्याचे आदेशात म्हटले आहे़लक्षण विरहीत ग्राहकांना परवानगी देण्यात यावी. फेस कव्हर किंवा मास्क असलेल्यांना प्रवेश द्यावा़ हॉटेलमध्ये संपूर्ण वेळ मास्क परिधान करणे तसेच हॉटेलमध्ये येणाºयांना आरोग्य सेतू अ‍ॅप बंधनकारक करण्यात आले आहे़ दरम्यान हॉटेल्समधील रेस्टॉरंट केवळ निवासींनाच उपलब्ध करण्यात यावे, गेमींग आर्केड, मुले खेळण्याचे क्षेत्र, जलतरण तलाव, व्यायाम शाळा बंद ठेवण्यात येणार आहे़ मोठी संमेलने तसेच जमावाला प्रतिबंध राहील. हॉटेल्समधील मिटींग हॉलचा वापर करताना जास्तीत जास्त १५ व्यक्तीना परवानगी देण्यात आली आहे़ जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे़ पावसाळा हा येथील पर्यटनाचा हंगाम आहे़ या निर्णयामुळे येथे येणाºया पर्यटकांना आधार मिळणार आहे़शासनाने परवानगी दिली असली तरी लोकांच्या मनात अद्याप भिती असल्याने हॉटेल सुरू केल्यानंतरही त्याला ग्राहकांच्या कितपत प्रतिसाद मिळेल ही शंकाच आहे़ याउलट हॉटेल चालकांच्या रोजचा खर्च वाढणारच आहे़ गेल्या चार महिन्यात व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे़ त्यामुळे शासनाने हॉटेल चालकांना मदत देण्याची आवश्यकता आहे़ नियमित परवाना, जीएसटी, वीज बिल व इतर सवलती मिळाव्यात़-डॉ़ रविंद्र चौधरी, अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा हॉटेल असोसिएशन