शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

पाच महिन्यांचे वेतन रखडल्याने होमगार्डचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सण-उत्सव आणि परीक्षा कालावधीत पोलीस दलाला सहाय्य करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे अर्थात होमगार्डसचे पाच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सण-उत्सव आणि परीक्षा कालावधीत पोलीस दलाला सहाय्य करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे अर्थात होमगार्डसचे पाच महिन्यांचे वेतन रखडल्याने त्यांचे हाल सुरु आहेत़ आॅक्टोबर २०१९ पासून वेतनच मिळाले नसल्याने अनेकांची उपासमार सुरु असून शासनाकडे वेतन देण्याची तरतूद नसल्याने बारावीच्या परीक्षांना देण्यात येणारा बंदोबस्तही नाकारला गेला आहे़जिल्ह्यातील विविध सण उत्सवांमध्ये दिवसरात्र पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी होमगार्ड पार पाडतात़ महिला आणि पुरुष होमगार्डची भरती प्रक्रिया करण्यात आल्यानंतर पोलीस दलासोबतच त्यांनाही वेळोवेळी कर्तव्यावर पाठवण्यात येते़ या कर्तव्याचे दिवसनिहाय वेतन देण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे़ मुंबई येथील गृहरक्षक दलाचे महासमादेशक यांच्या आदेशाने हे कामकाज सुरु आहे़ परंतू गेल्या दोन महिन्यांपासून विविध उपक्रमांना दिल्या जाणाºया बंदोबस्तावेळी केवळ पोलीस कर्मचारी आणि अधिकारीच नजरेस पडत असल्याने जनसामान्यात कुतूहल होते़ मात्र होमगार्ड नसल्याचे खरे कारण समोर येत असून पाच महिन्यांचे वेतन नसल्याने मुंबई येथील होमगार्ड महासमादेशक यांनीच राज्यभर वेतन दिल्याशिवाय कर्तव्य देऊ नये अशा सूचना केल्याची माहिती समोर आली आहे़ शासनाकडून लवकरच वेतन देण्याची कारवाई होणार असल्याची माहिती असताना दुसरीकडे सहा महिने होमगार्डची ड्यूटी आणि उर्वरित वेळ इतर कामांना जाणाऱ्यांचे हाल होत असल्याचे चित्र आहे़ पोलीस दलाने याकडे लक्ष देऊन पाठपुरावा करण्याची मागणी जिल्ह्यातील महिला आणि पुरुष होमगार्डची आहे़ परंतू शासनाकडूनच अद्याप निधी उपलब्ध झालेला नसल्याने पोलीस दलाचाही नाईलाज झाल्याचे चित्र आहे़जिल्ह्यात पोलीस दलासोबत वेळोवेळी होमगार्डची भरती प्रक्रिया झाली आहे़ यातून ९०० जण सध्या होमगार्ड म्हणून नियुक्त आहेत़ यात १०० महिला तर ८०० पुुरुष होमगार्ड आहेत़ समादेशकांच्या आदेशानंतर सण उत्सवासोबत, लोकसभा ते ग्रामपंचायत निवडणूका, सभा, संमेलने, महोत्सव यासह पोलीस बंदोबस्त मागणी असलेल्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी होमगार्डही नियुक्त केले जातात़ त्यांना यासाठी नियमित दैनंदिन भत्ता या प्रमाणे मानधनाची तरतूद आहे़ परंतू आॅक्टोबर महिन्यानंतर होमगार्डला मानधनच न मिळाल्याने त्यांच्यासह त्यांच्या कुटूंबियांचे हाल सुरु आहेत़जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर मंगळवारपासून बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला़ यावेळी कोणत्याही केंद्रावर होमगार्ड नसल्याने पोलीसांची मोठी धावपळ झाली़ येत्या काही दिवसातच पुन्हा दहावीच्या परीक्षा होणार आहेत़ यावेळी गृहरक्षक दलाची मोठी गरज भासणार आहे़ परंतू अद्याप त्याबाबत कोणताही आदेश काढण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आलेले आहे़मिळालेल्या महितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ९०० होमगार्डचे साधारण २ ते अडीच कोटी रुपये मानधनरुपाने थकले आहेत़ हे मानधन येत्या काळात मिळण्याची शक्यता असली तरी निश्चित कालावधी माहिती नसल्याने अनेक जण पोलीस अधिक्षक कार्यालयात चकरा मारत असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे़ पोलीस दलाने मुंबई येथील महासमादेशकांकडे याबाबत पाठपुरावा केला आहे़ परंतू शासनाकडूनच निधीचे निर्गमन झालेले नसल्याने येथवर मानधन आलेले नाही़राज्यस्तराव होमगार्डसाठी काम करणाºया होमगार्ड विकास समितीने जवानांच्या विविध समस्यांवर मार्ग काढण्यासाठी काही वर्षांपासून न्यायालयीन लढा सुरु केला होता़ यातून न्यायालयाने होमगार्डला महिन्याला ३० दिवस काम, सातव्या आयोगाप्रमाणे वेतन आणि इतर सुविधा देण्याचे शासनाला सूचित केल्याची माहिती आहे़ परंतू अद्याप या निर्णयाचा अंमलबजावणी झालेली नाही़जिल्ह्यात काम करणारे बहुतांश होमगार्ड हे नियमित ड्यूटी मिळत नसल्याने अर्थाजनासाठी छोट्या नोकºया करतात़ परंतू सहा महिने किंवा आठ महिने होमगार्डची ड्यूटी केल्यानंतर पुन्हा त्या कामावर दोन महिन्यासाठी कोणीही ठेवून घेत नाही़ परिणामी त्यांची परवड सुरु आहे़ मुलांच्या शाळा, घरखर्च, दैनंदिन खर्च यासाठी उधार उसनवार करत अनेकजण दिवस काढत असल्याचे सांगण्यात आले आहे़