शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बाम्हणे येथे अंत्यविधीत गेलेल्यांच्या शेतावरचे १९ मजूरही होमक्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रतापपूर : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे अंत्यविधी करुन परत आलेल्या प्रतापपूर ता़ तळोदा येथील १० जणांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रतापपूर : शिंदखेडा तालुक्यातील बाम्हणे येथे अंत्यविधी करुन परत आलेल्या प्रतापपूर ता़ तळोदा येथील १० जणांना आरोग्य विभागाने मंगळवारी क्वारंटाईन केले आहे़ बाम्हणे येथील मयत कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने ही कारवाई करण्यात आली होती़ यानंतर या १० जणांच्या संपर्कात आलेले शेतमजूरही बुधवारी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत़ यामुळे गावात तालुक्यात या प्रकाराची चर्चा सुरु झाली आहे़प्रतापपूर येथील तीन पुरुष आणि सात महिला असे १० जण १४ रोजी बाम्हणे येथे नातेवाईकच्या अंत्यविधीसाठी गेले होते़ हे सर्व लोक तेथून परतल्यानंतर मयत नातेवाईक हा कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती़ यामुळे तालुका आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत सर्वांना आमलाड ता़ तळोदा येथील क्वारंटाईन कक्षात दाखल केले आहे़ यानंतर गावात फवारणी व इतर उपक्रम सुरु करण्यात आले असताना या १० जणांच्या संपर्कात त्यांच्या शेतात काम करणारे तब्बल १९ मजूर आल्याची माहिती समोर आली होती़ यातून आरोग्य विभागाने तातडीने या सर्व शेतमजूरांची तपासणी करुन त्यांना होमक्वारंटाईन होण्याचे सूचित करण्यात आले आहे़ प्रतापपूर गावातील २९ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आणि होमक्वारंटाईन करण्यात आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे़ दरम्यान बुधवारी ग्रामपंचायत सरपंच रोहिदास पावरा, पोलीस पाटील बबन इंद्रजित, ग्रामसेवक पी़जी़माळी, निसारअली मक्राणी, सुरेश इंद्रजित, लक्ष्मण कोळी, प्रेमसिंग राजपूत यांनी गावात भेटी देत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली होती़ गावात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेले नागरिक आढळून आल्याने प्रतापपूर गावत १७ ते १९ जून या दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या काळात गावात अत्यावश्यक सेवा आणि शेतीकामेच सुरु ठेवण्याचे सांगण्यात आले आहे़ त्यानुसार ग्रामपंचायत कारवाई करत आहे़आमलाड येथे क्वारंटाईन केलेल्या सात महिला आणि तीन पुरुषांमध्ये कोरोनाची सध्यातरी लक्षणे नसल्याने त्यांचे स्वॅब घेण्यात येणार नाहीत अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे़ हे सर्व १० जण १४ दिवस याठिकाणी राहणार आहेत़