शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे चिनी वस्तूंची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाºया चिनी सैनिकांना रोखताना व सीमेचे संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या २० ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गलवान खोऱ्यात घुसखोरी करणाºया चिनी सैनिकांना रोखताना व सीमेचे संरक्षण करताना धारातीर्थी पडलेल्या २० भारतीय जवानांना शहरात श्रद्धांजली वाहण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजता पूर्ण शहरातील नागरिकांनी दोन मिनीटे स्तब्ध होऊन श्रद्धांजली अर्पण केली.शहरातील राष्ट्रीय सुरक्षा मंचतर्फे चीन सीमेवर धारातीर्थी पडलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता सायरन वाजल्यानंतर शहरातील सर्व नागरिकांनी आहे त्या ठिकाणी दोन मिनीटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार सकाळी ११ वाजता पालिकेचा सायरन वाजल्याबरोबर संपूर्ण शहरातील नागरिकांनी आहे त्या स्थितीत व जागेवरच श्रद्धांजली अर्पण केली. बाजारात, मुख्य रस्त्यांवर पायी चालणाºया नागरिकांनी व वाहनधारकांनी आपापली वाहने जागीच उभी करून अभिवादन केले. तत्पूर्वी सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकासमोरील चौकात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर चौकात चीनचे राष्टÑाध्यक्षाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. उपस्थित कार्यकर्त्यांनी चीनच्या विरोधात घोषणा देऊन ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. आमदार राजेश पाडवी यांनी चिनी मालावर बहिष्कारसंदर्भात कार्यकर्त्यांना प्रतिज्ञा दिली. या वेळी आमदार राजेश पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, पालिकेचे गटनेते प्रा.मकरंद पाटील, शहादा राष्ट्रीय सुरक्षा मंचचे अध्यक्ष डॉ.वसंत अशोक पाटील, माजी नगरसेवक विनोद शंकर सोनार, शिवसेना शहर प्रमुख तुषार पाटील, मराठा महासंघाचे शाम जाधव, डॉ.कांतीलाल टाटीया, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, महावीर पतसंस्थेचे चेअरमन रमेश जैन, भाजपा शहर अध्यक्ष अतुल जयस्वाल, पंकज सोनार, रवींद्र जमादार, ज्ञानेश्वर चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अजय शर्मा, संजय कासोदेकर, तालुका अध्यक्ष विजय मराठे, डॉ.हेमंत सोनार, मीनानाथ सोनार, गौरव जोशी, गणेश धाकड, भटू शिंपी, रुपेश सोनार, बबलू परदेशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.