तोंड ओढणीने बांधत दोरने मारहाण करून पत्नीचा केला खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By मनोज शेलार | Updated: July 2, 2023 17:33 IST2023-07-02T17:33:14+5:302023-07-02T17:33:45+5:30

पोलिस सूत्रांनुसार, पाचंबा येथील वळवी पती- पत्नीमध्ये घरगुती कारणातून वाद होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच कुरबूर होत होती.

He killed his wife by tying her mouth and beating her with a rope, a case was registered against her husband | तोंड ओढणीने बांधत दोरने मारहाण करून पत्नीचा केला खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

तोंड ओढणीने बांधत दोरने मारहाण करून पत्नीचा केला खून, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : घरगुती वादातून पत्नीचे तोंड ओढणीने बांधून तिला दोरने जबर मारहाण करून खून केल्याची घटना पाचंबा, ता. नवापूर येथे १ जुलै रोजी पहाटे घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधा सोनारसिंग वळवी (५०, रा. पाचंबा, ता. नवापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. तर सोनारसिंग साकऱ्या वळवी (५३, रा. पाचंबा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, पाचंबा येथील वळवी पती- पत्नीमध्ये घरगुती कारणातून वाद होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच कुरबूर होत होती. ३० जून रोजी मध्यरात्री ते १ जुलै रोजी पहाटे पाच वाजेदरम्यान सोनारसिंग याने पत्नी राधा यांचे तोंड ओढणीने बांधले. जेणेकरून त्यांनी आरडाओरड करू नये. तोंड घट्ट बांधल्यानंतर जाड दोराने त्याने जबर मारहाण केली. संपूर्ण शरीरावर मारहाण केल्याने जबर जखमी झालेल्या राधा यांचा मृत्यू झाला. सकाळी ही बाब समोर आल्यावर गावात खळबळ उडाली. याबाबत नवापूर पोलिसांना कळविण्यात आले.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत वनिता नितेश वळवी (२७, रा. पाचंबा) यांनी फिर्याद दिल्याने सोनारसिंग वळवी यांच्याविरुद्ध नवापूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार मनोज पाटील करीत आहे.

Web Title: He killed his wife by tying her mouth and beating her with a rope, a case was registered against her husband