शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाण्यासाठी त्यांचा एक हजार किलोमीटरचा सायकलीवरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. गावापासून लांब असल्याने दुसऱ्या राज्यात होणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहे. गावापासून लांब असल्याने दुसऱ्या राज्यात होणारे हाल आता मजुरांनाही असह्य होऊ लागले असून, मिळेल त्या वाहनाने घराकडे मजूर परतत आहेत. अनेक मजूर पायी तर काही सायकलीने गावाकडे निघाले आहेत. सोमवारी असेच सुरतहून उत्तरप्रदेशकडे निघालेल्या कामगारांना प्रकाशा येथील कार्यकर्त्यांनी विसाव्यासाठी सुविधा दिली.गुजरातमधील सुरत शहरात कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांची दयनिय अवस्था झाली आहे. त्यामुळे ते आपल्या राज्यात जाण्यासाठी वेगळा प्रयोग करीत आहेत. असाच प्रयोग सुरत शहरात पेन्टींगच्या कामासाठी आलेले उत्तर प्रदेशातील काही मजुरांनी केला. त्यांना परवानगी मिळत नसल्याने शेवटी त्यांनी सोशल डिस्टन्सचा वापर करत सायकलने प्रवास करण्याचे ठरवले व गेल्या चार दिवसांपासून सुरत येथून सायकलने प्रवास करीत सोमवारी महाराष्ट्रात दाखल झाले. सुरत, निझर, प्रकाशा, शहाद्यानंतर खेतियामार्गे उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहेत.सोमवारी प्रकाशात येथे सकाळी ११ वाजता आले असता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या नाश्ताची व्यवस्था करून दिली. नंतर शहादा येथे गेल्यावर एका शेताचा बांध्यावर पाणी चालू असताना त्यांनी तेथे आंघोळ करीत आराम केला व पुढील प्रवासाला सुरूवात केली. त्यांचा रोजचा प्रवास शंभर ते सव्वाशे किलोमीटर सायकलवरून होत आहे. हे सर्व मजूर असल्याने ग्रामस्थ त्यांची जेवणाची व्यवस्था करून देतात. कितीही ऊन असलं तरी त्यांचा प्रवास शंभर किलोमीटर सुरू आहे. आणखी पाच ते सहा दिवस त्यांना त्यांच्या उत्तर प्रदेशमधील बांधा जिल्ह्यात जाण्यासाठी लागणार आहे.गेल्या दीड महिन्यापासून हाताला काम व पैसा नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या नव्या व जुन्या सायकलीनेच त्यांनी सुरत ते उत्तर प्रदेश असा सुमारे हजार किलो मीटरचा प्रवास सुरू केला आहे.