नऊ लाख ८१ हजारांच्या गुटखा जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा

By मनोज शेलार | Updated: March 8, 2023 18:09 IST2023-03-08T18:08:36+5:302023-03-08T18:09:09+5:30

वाहनासह एकूण १३ लाख ८१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन सहा जणांविरुद्ध बुधवार ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha worth nine lakh 81 thousand seized, case against six persons | नऊ लाख ८१ हजारांच्या गुटखा जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा

नऊ लाख ८१ हजारांच्या गुटखा जप्त, सहा जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : अक्कलकुवा येथे नाशिक येथील विशेष पथकाने धाड टाकून ९ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. वाहनासह एकूण १३ लाख ८१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन सहा जणांविरुद्ध बुधवार ८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये किरण जालमसिंग तडवी (२५, रा. सोरापाडा), शुभम परदेशी (२८, रा. अक्कलकुवा), विनोद भगवानदास बनिया (३८, रा. अक्कलकुवा), दीपक परदेशी (३२, रा. अक्कलकुवा), राजू शेट (४०) व होला शेट (४५, रा. निझर) यांचा समावेश आहे. पोलिस सूत्रांनुसार, अक्कलकुवा गावात अवैधरीत्या गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गावात विनोद बनिया यांच्या जुन्या घरासमोर पाळत ठेवली असता, तेथे गुटखा आढळून आला. त्यात सात लाख ८८ हजार ३२० रुपयांचा विमल पानमसाला, एक लाख ९३ हजार ४४० रुपये किमतीचा व्ही-१ तंबाखू, असा एकूण नऊ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा व चार लाख रुपयांचे वाहन, असा एकूण १३ लाख ८१ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत विशेष पथकाचे पोलिस कर्मचारी बशीर तडवी यांनी फिर्याद दिल्याने सहा जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.
 

Web Title: Gutkha worth nine lakh 81 thousand seized, case against six persons