पालकमंत्र्यांनी केला बोंडग्रस्त भागाचा दाैरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 12:56 IST2020-11-06T12:56:25+5:302020-11-06T12:56:32+5:30
n लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे ...

पालकमंत्र्यांनी केला बोंडग्रस्त भागाचा दाैरा
n लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी शेतक-यांसोबत संवाद साधत माहिती घेतली
यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे, तालुका कृर्षी अधिकारी आर.एम.पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर.सी.हिरे उपस्थित होते. निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करण्याचे आदेश ॲड. पाडवी यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे तसेच किटकनाशक फवारणी करण्याच्या सूचनाही दिल्या. संकट काळात शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले..
भरपाईची मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागात गुलाबीबोंड अळीचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. यातून शेतक-यांचे नुकसान होत आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे. जिल्ह्यात यंदा एक लाख १८ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवड होती. यातील निम्मे कापसाची वेचणी अद्याप शिल्लक असून या पिकावर बोंडअळी पडत आहे.